उद्योग व्यवसाय क्षेत्रातील ‘ज्वारीचे’ महत्त्व! जाणून घ्या; ‘आरोग्यदायी’ ज्वारीचे महत्त्व…
Importance of 'sorghum' in industry and business sector! Learn; Importance of 'Healthy' Sorghum
ज्वारी एक सुपरिचित तृणधान्य. भारताच्या फार मोठ्या भागातील स्थानिक लोकांच्या आहाराचे ते मुख्य पीक आहे. समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्या वगळून इतरत्र, विशेषत: दक्षिणेकडील भागात, धान्य आणि जनावरांसाठी वैरण अशा दुहेरी हेतूने ज्वारीची लागवड केली जाते.ज्वारी ज्या भागात पिकविली जाते त्या भागातील गरीब लोकांचे ते आहारातील प्रमुख धान्य आहे. ज्वारीमध्ये तांदुळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
चला जाणून घेऊ उद्योग व्यवसाय क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पडते ज्वारी जाणून घ्या ज्वारीचे महत्त्व;
हेही वाचा: गुंतवणूकीपूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या; चला तर वाचूया इन्वेस्टमेंट स्मार्ट टिप्स…
कणसे काढून घेतल्यावर राहिलेली वाळलेली ताटे (कडबा) यांचा जनावरांना वैरण म्हणूनही उपयोग होतो. दाण्याचे पीठ करून त्याच्या भाकरी करतात अथवा लाह्या, हुरडा व लापशी या स्वरूपांतही दाण्याचा वापर करतात. दाण्यापासून ‘माल्ट’(Malt) तयार करतात व त्याचा उपयोग लहान मुलांचे अन्न तयार करण्यासाठी अथवा बिअर तयार करण्यासाठी करतात.
दाण्यातील स्टार्चापासून किण्वनाने (आंबवून) एथिल अल्कोहॉल, सिटोन व ब्युटिल अल्कोहॉल (Alcohol) तयार करतात. ज्वारीचा स्टार्च मक्याच्या स्टार्चाप्रमाणे असून त्याचा खाद्य पदार्थांच्या उद्योगांत आणि कापडधंद्यात खळीसाठी (For the threshing floor) उपयोग होतो. कागद आणि पुठ्ठा तयार करण्याच्या उद्योगातही ज्वारीच्या स्टार्चाचा (Of starch) खळीसाठी वापर होतो.
ज्वारीच्या ताटांपासून रासायनिक कृतीने तयार केलेला लगदा आणि लाकडापासून तयार केलेला लगदा यांच्या मिश्रणापासून लिहिण्याचा, वृत्तपत्राचा आणि वेष्टनाचा कागद (Paper) तयार करतात.
हेही वाचा: नाशिक : यंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच…
हेही वाचा: तुम्हाला माहित आहे का? ‘ट्रॅक्टर’ ची पुढील चाके मोठी व मागील चाके का लहान असतात?
ज्वारीचे आरोग्यदायी फायदे: (Health benefits of sorghum:)
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे (Of carbohydrates) प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून (From amino acids) शरीरास मुबलक प्रोटीन्स (Proteins) मिळतात. ज्यांना किडनी स्टोनचा (Of kidney stone) त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी.
हेही वाचा: ‘मखाना शेती’ म्हणजे काय व शेतीतून किती उत्पन्न मिळते; जाणून घ्या सविस्तर माहिती…
ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.
सध्या लठ्ठपणाचे प्रमाण वाढले आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा:
1. वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:
2. अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…