ताज्या बातम्या

प्रेमाच्या महिन्यात प्रेमाची सुरुवात करताय तर ‘या’ गुलाबांच्या रंगांचा अर्थ घ्या समजून !

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना.या महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो.७ फेब्रुवारी ला व्हॅलेंटाईन वीक ची रोझ डे ने सुरुवात होते.रोझ डे च्या निमित्ताने जोडपे त्यांच्या जोडीदारांना गुलाब देतात. परंतु काही लोक आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा प्रियजणांना गुलाब देऊन हा दिवस साजरा करतात. रोझ डे ला गुलाब देताना मात्र रंगाचा विचार करायला हवा. कारण प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा अर्थ वेगळा असतो.

वाचादेशातील सर्वात स्वस्त CNG कार तुम्हाला माहिती आहेत का ? जाणून घ्या ‘या’ पाच परवडेबल कार्स बाबत….

असे आहेत गुलाबाच्या रंगाचे अर्थ

१) लाल गुलाब : लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला लाल गुलाब
देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.

२) गुलाबी गुलाब : जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब किंवा गुलाबी गुलाब देऊ शकता. गुलाबी गुलाबाच्या रंगाचा आणखी एक अर्थ आहे तो म्हणजे मैत्री. जर तुमच्या एखाद्या मित्राने तुम्हाला गुलाबी गुलाब दिले तर त्याचा अर्थ असा आहे की तो ही मैत्री महत्त्वाची मानतो आणि या मैत्रीसाठी तुमचे आभार मानतो.

३) पिवळा गुलाब : जर कोणी तुम्हाला पिवळे गुलाब दिले तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला तुमच्याशी मैत्री करायची आहे. पिवळे गुलाब मैत्री आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहेत.

४) पांढरा गुलाब : पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. तसेच पांढरा गुलाब हे तक्रारी मिटवून पुढे जाण्याचे प्रतीक आहे. जर तुम्हाला कोणाची माफी मागायची असेल तर तुम्ही त्याला रोजच्या दिवशी पांढरे गुलाब देऊ शकता.

५) केशरी गुलाब : केशरी गुलाब हे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे प्रतीक आहे. म्हणजेच तुम्हाला जर कोणी आवडत असेल तर त्याला केशरी गुलाब देऊन तुम्ही तुमचे मन सांगण्याचा प्रयत्न करू शकता.

केवळ ५ मिनिटांमध्ये ५०,००० रुपयांचे ‘नो झनजट’ लोन; मित्रांनो लोन मिळवण्याची ही संधी सोडू नका…

६) काळा गुलाब : काळा गुलाब हे शत्रुत्वाचे प्रतीक आहे. या रंगाचा गुलाब द्वेषाचे प्रतीक आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा सप्ताह आहे, त्यामुळे रोज डेला काळे गुलाब देण्याची ही योग्य वेळ नाही.

प्रेम असणं जितकं गरजेचं असत तितकंच ते दाखवणं सुद्धा म्हणून प्रेमाच्या दिवसांचा हा महिना तुम्हालाही आनंददायी करायचा असेल तर आपल्या प्रिय व्यक्तीला नक्की गुलाब द्या.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button