खतापासून धान्य पिकवलेले पाहिले असेल आता धान्यापासून कंपोस्ट खत बनवलेला पहा; सरकारने घेतला मोठा निर्णय…
If you have seen grains grown from manure, now look at compost made from grains; The government took a big decision
शेतीमध्ये चांगले उत्पन्न (income) घेण्यासाठी खताचा (Fertilizer) वापर करतो हे तर तुम्हाला माहीतच असेल. सध्या याच खतातून पिकवलेल्या धान्याचा पुन्हा खत (Fertilizer) करण्याचा विचार सुरू आहे. गेल्यावर्षी वैनगंगा या नदीला पूर आल्यामुळे सरकारने (By the government) गोदामामध्ये ठेवलेले 6 हजार किंटल धान्य भिजले. या सडलेल्या धान्याचा कम्पोस्ट खत बनवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने (By the district administration) घेतला आहे आणि निर्णयाला सरकारने मंजुरी दिलेली आहे.
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पूर आल्यामुळे सरकारी गोदाममध्ये ठेवलेले सर्व भिजल्यामुळे खराब झाले होते.
धान्याला वाळवून परत व्यवस्थित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता पण अधिक खराब झाल्यामुळे ते धान्य व्यवस्थित नाही बनवू शकले. या धान्याचा कंपोस्ट खत (Fertilizer) बनवण्याचा विचार करून जिल्ह्या प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. आणि तो प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. 1999 च्या अन्नधान्यासंदर्भ निर्णयानुसार सरकारची मंजुरी मिळालेली आहे. आता धान्यापासून कंपोस्ट खत (Compost manure) बनवणार आहेत.
वाचा –मोठी बातमी: महिंद्राचा नवीन “रोटावेटर” लॉन्च, आता शेतीची मशागत करता येणार अधिक सोप्प्या पद्धतीत..
पाण्याच्या प्रवाहामुळे निम्मे धान्य नष्ट झाले –
गोदामामध्ये 17 हजार क्विंटल धान्यापैकी 6 हजार 263 क्विंटल धान्य हे नष्ट झाले होते. यामध्ये तांदूळ 3 हजार 826 क्विंटल , गहू 1 हजार 833 क्विंटल, तूर डाळ 266 क्विंटल , चना डाळ 188 क्विंटल, तसेच साखर 144 क्विंटल होती. सरकारी गोदामात 6 ते 7 फुट एवढे पाणी साचले होते त्यामुळे इतके धान्य नष्ट झाले.
धान्याच्या दुर्गंधीमुळे घेतला निर्णय –
खराब झालेले धान्य व्यवस्थित करायचा प्रयत्न जिल्ह्या प्रशासनाने केला होता. परंतु धान्य खराब झाल्याने त्याची नंतर दुर्गंधी पसरु लागली. आसपासच्या लोकांना याचा त्रास जाणवू लागल्याने कंपोस्ट खताचा (Compost manure) विचार केला.
लवकरच कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार धान्य –
गेल्या वर्षांपासून हे धान्य गोदामात होते. जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावानंतर आता हे सरकारच्या ताब्यात आहे. येथील साकोली कृषी विज्ञान केंद्रामध्ये (In the Center for Agricultural Sciences) हे धान्य पाठवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. तेथेच सडलेल्या धान्यापासून कंपोस्ट खत (Compost manure) तयार केला जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer) यांच्या मार्गदर्शनाखाली सडलेल्या धान्यापासून कंपोस्ट खत तयार केला जाणार.
हे ही वाचा –