ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

पिकांच्या जीवनक्रमामध्ये ‘ह्या ‘ कमतरता असल्यास दिसतील ‘हे’ लक्षणे…

If there is a deficiency in the life cycle of the crop, the symptoms will appear.

ज्याप्रमाणे मानवी शरीराला वाढ होण्यासाठी विविध जीवनसत्वे आवश्यक असतात. प्रथीने, कर्बोदके, आवश्यक आहेत. त्याच प्रमाणे पिकांना देखील उत्तमरित्या बहरण्यासाठी वेगवेगळ्या घटकांची आवश्यकता असते. माती व विविध खतापासून अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात वापर झाल्यास पिकांचे जीवन चक्र सुरळीत होते. पीकवाढीसाठी गरजेनुसार अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करावा.
पिकांच्या वाढीसाठी 18 प्रकारच्या अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. या त्यातील काही अन्नद्रव्याची माहिती पाहू.
अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दृश्‍य परिणाम दिसून येतो.


अन्नद्रव्याचे वर्गीकरण भरपूर लागणारे मुख्य अन्नद्रव्य व कमी प्रमाणात लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्य यांमध्ये केले जाते. पिकांचा जीवनक्रम पूर्ण होण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाची भूमिका फार महत्त्वाची ठरते. त्यासाठी आपण पिकांना लागणारे अन्नद्रव्य ते स्थान त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसून येणारी लक्षणे. मागील भागात आपण त्यातील काही घटकांचा अभ्यास केला. उर्वरित घटक आपण या भागात पाहूया

मॅग्नेशियम चे कार्य

 • मॅग्नेशियम पिकांच्या हरितलवकच्या य केंद्राचा मुख्य भाग असतो.
 • पिकाच्या पचन क्रियेमध्ये महत्त्वाचा वाटा असतो.

*मॅग्नेशियम पिकाच्या प्रकाशसंश्‍लेषण क्रियेमध्ये महत्त्वाचा वाटा पार पडतो.

कमतरता असण्याची लक्षणे

आम्लधारी जमिनीमध्ये जिचा सामू सातपेक्षा कमी असतो. त्यामध्ये मॅग्नेशिअमची कमतरता असते
पिकांच्या पानाच्या शिरा पिवळ्या पडतात
पिकांमध्ये तेल व प्रथिने कमी पडते
पानांवर लाल व पिवळे ठिपके उमटतात व पाने आकस्मित गळून पडतात.

झिंक चे कार्य

 • वाढ बिंदूची वाढ झपाट्याने होण्यास मदत करते.

*झिंक हे परागकण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

*प्रथिने कर्बोदके प्रकाश संश्लेषण यासाठी झिंक महत्त्वाचे कार्य पार पडते.

कमतरता असण्याची लक्षणे

*पानांचा आकारमान लहान होतो.

 • पानांच्या शिरा मध्ये तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. शेवटी पाने पिवळी पडतात.
 • पिकांची वाढ खुंटते.परीपक्वते चा कालावधी वाढतो.
  झुडपांत प्रमाणे शेंड्याची वाढ देखील खुंटते.

फेरस चे कार्य.

 • हरितद्रव्य तयार करण्यास मदत करते.
 • पिकांतर्गत ऊर्जाच्या वाहनासाठी गरजेचे.
 • सहजीवी नायट्रोजनच्या स्थिरीकरण क्रियेत महत्त्वाचे आहे.

कमतरता व लक्षणे

 • फेरस ची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानावर पाहायला मिळते. *पाणी फिकट पिवळी व पांढरी होऊन गळतात.
 • फळांचा आकार लहान होत.
 • नवीन फांद्या वाकड्या होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button