भेंडी हे पीक वर्षभर घेतले जाणारे पीक आहे. भेंडी हे एक उत्तम व चांगले फळभाजी पीक आहे.भेंडीमध्ये कॅल्शिअम व आयोडीन हि मूलद्रव्य असतात तसेच क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्ट्रात भेंडी या पिकाखाली ८१९० व्हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. महाराष्ट्रात भेंडी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात भेंडीला चांगला दर मिळतो व मागणीही तितकी वाढते.
भेंडीच्या पिकासाठी जमीन कशी असावी?
भेंडी पीक सुपीक हलक्या मातेत चांगले येते. मध्यम व भारी जमिनीतही चांगली लागवड होते. कमी पाण्यात चांगले पीक येते. ज्या भागात पाण्याची कमतरता असेल त्या ठिकाणी भेंडी लागवड उत्तम होते. उत्पादनही चांगले निघते. भेंडी पिकाला 20 ते 40 सेल्सिअस तापमान चांगले मानवते.
- भेंडी लागवडीसाठी जमिनीची मशागत कशी करावी?
- एक नांगरट व दोन कुळवण्या करुन जमिन भुसभूशित करावी.
- शेणखत कोणत्याही पिकासाठी गरजेचा असतो. तो हेक्टरी 50 गाडया शेणखत मिसळून तिसरी कोळवणी करा.
- पेरणीसाठी खरीप हंगामात दोन ओळीतील अंतर 60 सेमी तर उन्हाळयात 45 सेमी ठेवावे.
- प्रत्येक ठिकाणी दोन बियांणी टोकणी करावी. दोन ओळींमधल्या झाडांमध्ये अंतर 30 सेमी ठेवा.
- लागवडीसाठी उन्हाळयात स-या पाडून बी टोकावे. शेतात ओलवणी करुन वाफसा आल्यानंतर बी पेरावे.
वाचा : अबब! हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचा वापर करून मिळावा दुग्ध जनावरांसाठी 10 दिवसात चारा…
बियाणे-
खरीप हंगामात हेक्टरी 8 किलो आणि उन्हाळयात 10 किलो बियाणे टाका आणि 1 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम चोळणे गरजेचं आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :