कृषी बातम्या

पीक पाहणी नाही केली तर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा राहणार का? पहा याविषयी सविस्तर माहिती..

रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी शेतकरी 16 ऑक्टोबरपासून करू शकणार आहेत. जर या पिकांच्या नोंदी काही तांत्रिक अडचणीमुळे करायच्या राहिल्या तर शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा 7/12 कोरा राहण्याच्या काही अडचण येतील का? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..

वाचा –

इ-पीक पाहणी :

शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं नोंदवणं याला ई-पीक पाहणी म्हणतात. 13 ऑगस्टपासून राज्यभरात हा उपक्रम राबवला जातो. याआधी गावातील तलाठ्यामार्फत शेतातल्या पिकांची नोंद केली जात होती. आता शेतकरी स्वत: आपला पीक पेरा नोंदवू शकणार आहे. त्यासाठी महसूल विभागानं ई-पीक पाहणी नावाचं अँप विकसित केलं आहे.

वाचा –

पीक पाहणी नाही केली तर सातबारा कोरा राहणार का?

एखादा शेतकरी काही तांत्रिक किंवा इतर अडचणींमुळे पीक पाहणी करू शकला नाही, तर त्याचा सातबारा उतारा कोरा राहणार नाही आणि त्याला सरकारी योजनांपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी माहिती दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, त्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करून घेण्यास सूचना दिलेल्या आहेत. आता 15 ऑक्टोबरपासून तलाठी स्तवरावर पीक पाहणी सुरू होणार आहे. म्हणजे जे शेतकरी पीक पाहणी करू शकले नाहीत, त्यांनी आपल्या पिकांची माहिती तलाठ्यापर्यंत पोहोचवायची आहे. त्यानंतर तलाठी या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद करणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा सातबारा कोरा राहणार नाही, तसंच कोणताही शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही. याची जबाबदारी तालाठ्याकडे असणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button