कोरोना ‘लसीकरण’, केल्यास मोदी सरकार कडून मिळणार ‘इतके’ रुपये!
If Corona is 'vaccinated', Modi government will get 'so much' money!
कोरोनाच्या लसीकरनाबाबत अनेक गैरसमज नागरिकांमध्ये आहेत लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी वेगवेगळ्या उपाय सरकार करत आहे. मोदी सरकारने लसीकरण करण्यासाठी एका स्पर्धचे आयोजन केले आहे. नुकतेच मोदी सरकारने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्याशी चर्चा केली व या चर्चा दरम्यान त्यांनी 11एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधी मध्ये ‘लसीकरण उत्सव’ जाहीर करण्यात आला.
लसीकरण केंद्रावर काही ठिकाणी वेगवेगळ्या भेट वस्तू दिल्या जातात. आयोजित मोदी सरकारने केलेल्या स्पर्धमध्ये काही अटी देखील आहे. स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तीने कोरोनाची लस घेतली असल्यास लसीकरण करत असतानाचा फोटो काढून एक सूंदर टॅग लाईन बनवायची आहे की ज्यामधून लसीकरणाचे महत्व लोकांना कळले पाहिजे.
📌या स्पर्धमध्ये भाग घेण्यासाठी mygov.inया वेबसाईट वर जाऊन लॉगिन करणे.
📌त्यामध्ये आवश्यक माहिती भरावी.
📌लसीकरण करतानाचा फोटो व टॅगलाईन त्यावर पाठवा.
📌देशभरामधून आलेले फोटो मधून उत्तम फोटो आणि उत्तम टॅगलाईन ज्यांची आहे अशा दहा विजेत्यांची निवड केली जाईल, त्यांना पाच हजार रुपये दिले जातील.
असे एका हिंदी वर्तमानपत्राने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. व त्याकरिता या स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.