माझा शेतकरी झाला “मी E-शेतकरी”: ऑनलाईन जमिनीचा फेरफार कसा पाहायचा? वाचा सविस्तर…
I became a farmer "I am an e-farmer": How to view land conversion online? Read more
गाव नकाशा शेत जमीन गावठाण यांच्याशी निगडीत येणारा शब्द म्हणजे सातबारा आठ अ म्हणजेच फेरफार. गावाकडे या फेरफार शब्दाला फार मोठे स्थान आहे. एखाद्या जमिनीची नोंदणी, वारस नोंदणी, आकार, जमीन खरेदी विक्री,जमिनीवर बोजा चढवणे, जमिनीवर बोजा उतरवणे या संबंधित सरकारी कागद म्हणजेच जमिनीचा फेरफार.बराच वेळेस जमिनी खरेदी करताना फेरफार चेक केला जातो. यासाठी सरकारी कार्यालयांना हेलपाटे घालावे लागतात, अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात. पण आता मात्र सरकारने खास तुमच्यासाठी घर बसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात बरेचसे कामे ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. त्यापैकी हे सातबारा, आठ अ, हेसुद्धा आपण ऑनलाईन बघू शकतो.
कसा बघायचा ऑनलाईन?
सातबारा ऑनलाइन पाहाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वर bhulekh.mahabhumi.hov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेत स्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. त्यानंतर आपली चावडी हा पर्याय तिथे उपलब्ध असेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल नोटीस बोर्ड नावाचे पेज उघडेल त्या पेजवर तुम्ही तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि गावाचे नाव इंटर करायचे आहे.
यानंतर तुमच्या गावातील सगळ्या फेरफार नोंदी तुम्हाला दिसतील.या फेरफार नंबर तुम्हाला दिसतील या फेरफार नंबर आले पुढील पहा हा पर्याय दाबल्यास एक पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला गट नंबर, फेरफार चा प्रकार आणि तारीख दिसेल. यावरून आपण मोजणी सुद्धा मागू शकतो, किंवा दुसरी कोणी मागवली असेल ते सुद्धा आपल्याला कळू शकते.