ताज्या बातम्या

मी E शेतकरी चॅनलचे एकच ध्येय… “बळीराजा सुखी होऊ दे”

I am the only goal of E Shetkari Channel… "Let Baliraja be happy"

आज गुढीपाडवा नववर्ष नवा उत्साह ,नवा जल्लोष साजरा करत नववर्षाची स्वागत केले जाते. मात्र या वर्षी कोरोणाच्या या पार्श्वभूमीवर या उत्साहाला किती रंग मिळेल सांगता येणार नाही. तरी ही गुढी उभारताना त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतल्यास हा सण अत्यंत लाभदायी ठरेल. गुढीपाडव्याच्या अनेक पौराणिक कथा आहेत, जसे की ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी पृथ्वी निर्माण केली किंवा काही पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे,

महादेव आणि पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला म्हणून आदिशक्तीची या दिवशी पूजा केली जाते. काही पौराणिक कथेनुसार श्री रामचंद्र वनवास संपवून घरी परतले असे असले तरी आपण गुढी पाडवा हा सण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊयात.

चैत्र महिन्यापासून वसंत ऋतु ला प्रारंभ होतो , वातावरणातील बदलामुळे जुनी वाळलेली सुरकुतलेली पाने पडून नवीन पालवीला प्रारंभ होतो,त्याच प्रमाणे आपणही जुन्या कटु आठवणी , वाईट प्रसंग याला विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी हा संदेश गुढी आपल्याला देत असते,

या दिवसात आंब्याला मोहर लागण्यास सुरुवात होते जणू आपण निसर्गाचे स्वागतच करत आहोत यासाठी आंब्याची डाहाळी लावली जाते. तापलेला उन्हाळा आणि त्यापासून लागणाऱ्या झळा या पासून आराम मिळण्याकरिता निसर्गानेच कडूलिंबा रुपी औषध दिले आहे, यासाठी कडुलिंबाचा पाला देखील गुढी लावला जातो .


कडूलिंब औषधी व गुणकारी मानले गेले आहे ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. तसेच कडूलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकल्यास त्वचाविकार नाहीसा होतो. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते “,बळीराजाच राज्य येऊ दे” ! “राज्यातील बळीराजा सुखाचे दिवस पाहू दे” तो व त्याचे कुटुंब” पुरणपोळीचा घास खाऊ दे “त्याच्या “शेतमालाला सोन्याचा भाव मिळू दे ” हीच गुढीपाडव्यानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना “मी E शेतकरी ” च्या वतीने तुम्हाला गुढीपाडव्याच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा…

-दिपाली सुरेश फडतरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button