मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?
I am talking about farmers, do you know when and where the invention of agriculture started?
भारतामध्ये बहुतांशी लोक शेती व्यवसाय करतात, पण तुम्हाला माहित आहे का शेतीचा शोध कधी लागला? कुठे लागला? शेतीचे स्वरूप व उत्पत्ती कशा प्रकारे झाली? किंवा पूर्वीच्या काळामध्ये भारतीय शेतीचे स्वरूप कसे होते या प्रश्नांचे उत्तर आपण या सत्रामध्ये पाहणार आहोत.
शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात (fertile crescent) लागला.
खरेतर पूर्वीच्या काळी स्त्रिया (Women) खाद्यपदार्थाचे बनवण्याकरता वनस्पतीचे निरीक्षण करून बियांचे निरीक्षण करत असे, ज्या बियांमध्ये टिकाऊ समता दिक असेल या बिया त्या साठवून ठेवत व पुढील हंगामासाठी त्याचा उपयोग करत असत यातून शेतीचा विकास होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये शेती तंत्रज्ञानाचा विकास झाला नसल्या कारणामुळे शेतीचे सर्व कामे हाताने केली जात असे त्यामध्ये शेताची मशागत, पेरणी ही सर्व कामे असल्याने त्यामध्ये जास्त कष्ट देखील होते, हळूहळू प्रगती करत ही कामे जनावरांच्या सहाय्याने केली जात.
सुरवातीच्या काळात गवतांच्या काही जातींमधून गव्हाचे ऐमर (emmer) व आईन कॉर्न (einkorn) हे दोन प्रकार व जव (barley) असे धान्यप्रकार तर काही मसुरीसारख्या डाळींचे प्रकार (lentils) शोध लावण्यात आला.
भारतामधील पूर्वीच्या काळी शेती… (Early agriculture in India)
पूर्वीच्या काळी शेतीमधील शाश्वतता हा प्रमुख आधार मानला जात असे, तसेच गावाजवळील वनांचे संरक्षण करणे हे देखील कर्तव्य मानले जात असे, स्थानिक परिस्थितीशी सुसंगत अशा बियाणांचा वापर २. मातीचे स्वास्थ टिकवून ठेवणे आणि शेतीतील जैवविविधता भारतीय शेतीचा त्रिसूत्री आधार होता.
भारतीय शेती मधील प्रमुख आव्हाने… (Major Challenges in Indian Agriculture)
1) भारतामध्ये 93 टक्के लोकांकडे 4 हेक्टर इतके क्षेत्र असून त्यातील 73 टक्के लोकांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. त्यामागे त्यामध्ये 65 टक्के जमीन कोरडवाहू आहे.
2) संकरित बियाणे दरवर्षी विकत घ्यावी लागत असतात,शेतकर्यांची बियाणांच्या बाबतीत बाजाराकडून होणारी लूट हे देखील मोठे आव्हान आहे.
3) ‘मातीचे स्वास्थ विचारात घेऊन पिके लागवड करण्याची गरज भासत आहे.
हे ही वाचा :
1)IFFCO तर्फे नवीन खतांचे दर जाहीर! वाचा खतांचे नवीन सुधारित दर…
2)सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग ही संधी तुमच्यासाठी पहा कुठे आहे, नोकरीची संधी…