शेती कायदे
ट्रेंडिंग

Varas Nond Online | शेतजमीन वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

Varas Nond Online | शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यावर, त्याच्या वारसांना शेतजमिनीच्या हक्कासाठी अधिकृत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. परंतु, बऱ्याच वेळा लोकांना वारसा हक्काच्या नोंदणीची प्रक्रिया कशी करावी हे माहीत नसते. मात्र, आता हे सर्व काम घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने केले जाऊ शकते. चला, जाणून घेऊ या वारसा हक्काची नोंदणी कशी करायची आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागतात. (Varas Nond Online)

Varas Nond Online | वारसा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • मृत्यू प्रमाणपत्र
  • 8 अ चा उतारा
  • सर्व वारसांचे पत्ते आणि नात्याचे पुरावे
  • शपथेवरील प्रतिज्ञापत्र

Varas Nond Online | नोंदणीची प्रक्रिया

  1. मृत्यू नोंदणी: शेतजमीन मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांच्या आत संबंधित महसूल कार्यालयात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  2. अर्ज सादर करणे: अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित महसूल कार्यालयात जमा करावा लागतो.
  3. चौकशी प्रक्रिया: अर्जाच्या माहितीची पडताळणी सरपंच, पोलीस पाटील यांच्याकडून केली जाते.
  4. फेरफार रजिस्टर नोंद: चौकशी पूर्ण झाल्यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नोंद केली जाते.
  5. आदेश जारी: सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, 15 दिवसांच्या आत नोंदणीसाठी अंतिम आदेश काढला जातो.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  1. सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटवर भेट द्या.
  2. नंतर ‘ई हक्क प्रणाली’ वर क्लिक करा आणि ‘Create New User’ चा पर्याय निवडा.
  3. नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा आणि लॉगिन करा.
  4. ‘7/12 Mutations’ पर्याय निवडा.
  5. अर्जदाराची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर, तलाठी कार्यालयात त्याची पडताळणी केली जाते आणि फेरफार रजिस्टरमध्ये नोंद केली जाते.

वारसा हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी यातील फरक

नॉमिनीला केवळ आर्थिक व्यवहारांसाठी अधिकार मिळतात, परंतु वारसा हक्क प्रमाणपत्राने जमिनीच्या मालकीसाठी अधिकार मिळतात. यामुळे, वारसा हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी हक्क यामध्ये स्पष्ट फरक आहे.

हेही वाचा:

भाजप दिलेला शब्द पाळणार! आता शेतकऱ्यांना पिएम किसानचे मिळणार 9 हजार, पाहा सविस्तर

मोठी बातमी! दुष्काळग्रस्त 3 विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून मदतीचे 592 कोटी रुपये जमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button