
Pig troubles| सध्या हंगाम आहे आणि अनेक ठिकाणी पिके उगवली आहेत. या काळात शेतकऱ्यांना डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. डुकरांच्या हल्ल्यामुळे (Because of the attack) मोठ्या प्रमाणात पीक नुकसान होते. त्यामुळे डुकरांपासून पिके वाचवण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पारंपारिक पद्धती:
- स्थानिक डुकरांच्या शेणाचा वापर: स्थानिक डुकरांच्या शेणापासून तयार कलेले द्रावण पिकांच्या सभोवताली टाकून मातीत मिसळणे. यामुळे रानडुकरांना असे वाटते की दुसरेच रानडुक्कर शेतात आहेत आणि ते शेतात प्रवेश करणार नाहीत. दर सात दिवसाच्या अंतराने हे केल्यास रानडुकरांपासून नुकसान कमी होते.
- श्वसन निवारक म्हणून मानवी केसांचा वापर: मानवी केसांचा वापर रानडुकरांची दिशाभूल (Misguided) करण्यासाठी करता येतो. रानडुक्कर आपले नाक जमिनीवर गाजते आणि केस नाकात गेल्यामुळे ते चिडतात आणि मोठ्याने आवाज करतात. त्यामुळे इतर रानडुकरांना धोक्याची बातमी मळते आणि ते पिकाकडे येत नाहीत.
- स्थानिक डुकरांच्या गौऱ्या जाळणे: स्थानिक डुकरांचे वाळलेले शेण एका मातीच्या भांड्यात जाळून त्याचा धूर शेतात करावा. या धुराच्या वासाने रानडुकरांना असे वाटते की हे स्थानिक डुकरांचे क्षेत्र आहे आणि ते तेथून निघून जातात.
- ड्रम वाजवणे/फटाके फोडणे: हा उपाय सामुदायिक रित्या केल्यास जास्त परिणामकारक (Effective) ठरतो. आवाज करणे, घंटा वाजवणे, फटाके वाजवणे, आरोळ्या देणे अशा प्रकारे डुकरांना पळवून लावता येते. ऑटोमॅटिक घड्याळे वापरूनही सतत आवाज करता येतो.
- स्थानिक कुत्र्यांचा वापर: स्थानिक कुत्र पाळून त्यांना शिकवून डुकरांना पळून लावण्यासाठी वापरता येतो.
वाचा:Alcazar| नवीन फेसलिफ्टेड हुंडई अल्काझार सप्टेंबरमध्ये येत आहे|
पर्यावरण पूरक उपाय:
- जैविक कुंपण: घायपात, करवंद, काटेरी, निवडुंग (Cactus) , झुडपे, तुती, बोर अशा वनस्पतींचा वापर करून संरक्षणात्मक कुंपण तयार करता येते.
- अंड्यांची फवारणी: अंड्याचा रस पाण्यात मिसळून पिकाच्या सभोवताली फवारणी केल्यास नैसर्गिक गंध निर्माण होतो आणि डुकरे दूर राहतात.
- काटेरी तरेचे कुंपण: शताभोवती काटेरी तारेचे कुंपण बनवणे हा एक प्रभावी उपाय आहे.
- सौर विजेचे कुंपण: सौर ऊर्जेवर चालणारे विद्युत कुंपण डुकरांना आघात देत नाही परंतु त्यांना दूर ठेवते.
- खड्डा पद्धत: पिकाभोवती खड्डा घेतल्यास डुकर आत येऊ शकत नाहीत आणि पीक नुकसानीपासून वाचते.
इतर उपाय:
- थिमेट फॉरेस्ट दाणेदार कीडनाशकाचा वापर: थिमेट कीटकनाशक पॉलिथिनमध्ये भरून शेतात ठेवल्यास त्याचा