या’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना मिळणार दहा लाख रुपयाचे अनुदान कसा कराल ऑनलाईन अर्ज पाहा एका क्लिकवर..
How to make a grant of Rs. 10 lakhs to the farmers through this scheme. See the online application with one click.
शेतकऱ्यांसाठी (farmers) सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे “सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना” (Micro food processing plan) होय शेतीतील अनेक फळे हे नाशवंत असल्याकारणाने, त्यावर प्रक्रिया करून शेतकरी उद्योजक होऊ शकतात. व त्यामुळे त्यांना जास्त आर्थिक लाभ प्राप्त (Receive financial benefits) होतो त्याचप्रमाणे होणारे नुकसान हे टाळले जाऊ शकते यासाठी ही सरकारी योजना महत्वपूर्ण ठरते. पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.
उद्योग स्थापनेसाठी उद्योजकांना अनुदान-सहाय्य स्वरूपात मुख्यतः पत संलग्न अर्थसहाय्य प्रदान करते. प्रधानमंत्री किसान संपदा (Prime Minister Kisan Sampada) योजनेतील संबंधित घटक योजनांतर्गत सहाय्य करत महाराष्ट्रात आतापर्यंत, 3 मेगा फूड पार्क , 62 शीतसाखळी प्रकल्प, 12 कृषी प्रक्रिया समूह, 39 अन्न प्रक्रिया उद्योग , मागास आणि अग्रेषित संलग्न 12 प्रकल्पाची निर्मिती आणि 26 अन्न चाचणी प्रयोगशाळांना अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (Ministry of Food Processing Industries) मंजुरी दिली आहे.
उद्योगांसाठी 921.53 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील धुळे (Dhule) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यांतील केळीला एक जिल्हा एक उत्पादन म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
सरकारने कृषी आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी टोमॅटो, कांदा आणि बटाटा यासह २२ नाशवंत उत्पादनांसाठी “ऑपरेशन ग्रीन स्कीम” (Operation Green) ची व्याप्ती वाढविण्याची घोषणा केली आहे.
या योजनेची कोणत्या बाबींचा समावेश होतो तसेच योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत तसेच अधिक माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या शासकीय जीआर वर क्लिक करा.
या योजनेत सहभाग नोंदवून यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
https://pmfme.mofpi.gov.in/pmfme/#/Home-Page
या लिंक वर क्लिक केल्यानंतर इतंभूत सर्व माहिती भरा. सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करा उदाहरणार्थ आधार कार्ड, वोटर आयडी.
सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करा. अधिक माहितीसाठी तुम्ही जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा.