अनेक वेळा डीएपीमध्ये खडे आढळून येत असतात. सर्वात जास्त महाग असलेल्या अमोनिया फास्टेटमध्ये खूप बनावट होत असते.
डीएपी
डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. अथवा डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे.
युरिया
युरियाचे दाणे पाण्यात टाकल्यानंतर तर ते पाण्यात विरघळतात आणि हाताला पाणी थंड लागत असेल तर युरिया असली असल्याचे समजावे. अथवा
काही दाणे गरम तव्यावर टाकावे, आच वाढवल्यानंतर हे दाणे नाहिसे झाल्यास हे हा ओरिजनल किंवा उकृष्ट युरिया आहे.
पोटॉश
काही दाण्यांवर पाणी टाकल्यानंतर जर दाणे एकमेकांना चिटकत असतील तर तर त्यात काही तरी बनावटपणा असल्याचे समजावे आणि पाण्यात टाकल्यानंतर पोटॉश विरघळत असते, पाण्याच्या वरच्या भागात लाल रंग दिसत असतो.
सुपर फास्फेट
सुपर फास्फेटचे दाणे जाड आणि बदाणी रंगाचे असतात. सुपर फास्फेटचे काही दाणे गरम केल्यानंतर याचे दाणे ही फुलले किंवा फुटले नाही तर समाजावे की, यात कोणताच बनावटपणा नाही. सुपर फास्फेटचे दाणे कठिण असतात, नाखांनी हे दाणे तुटत नाहीत.
वाचा मोठी बातमी; या जिल्ह्याची अतिवृष्टी भरपाई यादी जाहीर…
जिंक सल्फेट
जिंक सल्फेटचे दाणे हे सफेज तसेच भुरक्या रंगाचे बारीक असतात. जिंक सल्फेटमध्ये मॅग्नीशिअम सल्फेटची भेसळ केली जाते. दोन्ही खते एकसारखी दिसत असल्याने दोघांचा फरक करणे सोपे नसते.
हे ही वाचा:
1)Weather Update: पुढील तीन दिवसांमध्ये “या” जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस वाचा सविस्तर वृत्तांत…
2)” मागेल त्याला शेततळे “योजनेची संपूर्ण माहिती, अटी, तसेच कसा कराल अर्ज?
WEB TITLE: How to identify the fake in the manure; Identify in a very simple way …