कृषी बातम्या

Proof of being a farmer | शेतकरी असल्याचा दाखला कसा मिळवावा व जाणून घ्या शेतकरी दाखल्याचा अर्ज कुठे करायचा ? शेतकरी दाखला चे फायदे !

How to get farmer certificate and know where to apply for farmer certificate? Benefits of Farmer Certificate!

आपल्या देशामध्ये बहुतांशी लोक शेती व शेतीपूरक व्यवसाय करतात. म्हणूनच ‘ जय जवान जय किसान’ असे म्हटले आहे. शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. तुम्हाला माहित आहे का? शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र सुद्धा मिळू शकते. (Proof of being a farmer) ते कुठे काढायचे? त्याचे फायदे काय? हे आपण जाणून घेऊयात.

कृषी शाखेची पदवी घेताना, आपल्याला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असेल तर त्याचा निश्चितच फायदा होतो. तसेच जमीन खरेदी करताना, शेतकरी असण्याचा दाखला सादर करावा लागतो. हे प्रमाणपत्र कुठून मिळवायचे? हे आपण पाहू:

👉 शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रावर तसेच ‘आपले सरकार’ या पोर्टल वर देखील उपलब्ध आहे.
आपण या वेबसाईट भेट देऊन हे प्रमाणपत्र मिळू शकतो.याबरोबर काही कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे.

👉 पॅन कार्ड, आधार कार्ड,पासपोर्ट,मतदान कार्ड,ड्रायव्हिंग परवाना, फोटो, रोजगार हमी ओळखपत्र.

👉 स्वयंघोषणा पत्र म्हणजेच शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागते.हे बंधनकारक आहे.असे केल्यावर 15 दिवसामध्ये हे प्रमाणपत्र मंजूर होते.

👉 कसा कराल अर्ज :

आपले सरकार या वेबसाईट वर गेल्यावर नवीन वापरकर्ता नोंदणी करून त्यामध्ये नाव, मोबाईल नंबर,ई-मेल आयडी टाका. त्यामध्ये महसूल विभाग वर क्लिक करून महसूल सेवा निवडा. त्यामध्ये शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय निवडा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. अर्जभरल्यावर मिळणारी पावती जतन करून ठेवा. पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र मिळून जाईल.
अश्याच, प्रकारची माहिती पाहण्यासाठी, योजना शेती तंत्रज्ञ, शेतीला पूरक व्यवसाय पाहण्यासाठी आमच्या मी E शेतकरी चॅनेल फॉलो करा.

🙂 हे देखील वाचा :

👉 हे प्रमाणपत्र भविष्यात जपून ठेवा, विमा काढण्यासाठी फायद्याचे पहा सविस्तर


👉 सरकार देत आहे.3000 रुपये महिन्याला वाचा काय आहे सविस्तर बातमी :

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button