Online Property Card | डिजिटल सही असणारे प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं? सोपी प्रक्रिया जाणून घरबसल्या करा डाऊनलोड
Online Property Card | महाराष्ट्र सरकारने नागरिकांना एक मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्हाला प्रॉपर्टी कार्डसाठी सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकारने डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे नागरिक आता घरबसल्या, मोबाईल किंवा संगणकावरून सहजपणे प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकतात. (Digital Signature on Property Card)
What is a property card? | प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
प्रॉपर्टी कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे, ज्यामध्ये बिगरशेती जमिनीच्या मालमत्तेची माहिती असते. यामध्ये घर, दुकान, बंगल्याचा तपशील, त्याचे स्थान, आकार व इतर संबंधित माहिती दिलेली असते. शेतजमिनींसाठी जसा सातबारा उतारा असतो, तसंच स्थावर मालमत्तेसाठी प्रॉपर्टी कार्ड असतं.
How to make a digital property card?
| डिजिटल प्रॉपर्टी कार्ड कसे बनवावे?
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या भुलेख पोर्टलवर (bhulekh.mahabhumi.gov.in) जावं लागेल. पोर्टल ओपन झाल्यानंतर “Digitally Signed Property Card” या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP घेऊन लॉगिन करा. नंतर विभाग, जिल्हा, भूमी अभिलेख कार्यालय आणि गाव निवडा. त्यानंतर CTS (City Survey) नंबर टाकून संबंधित मालमत्तेचा तपशील निवडा आणि आवश्यक शुल्क ऑनलाइन पेमेंट करा. शुल्क भरल्यानंतर, तुम्ही प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.
प्रॉपर्टी कार्ड काढण्याचे शुल्क
प्रॉपर्टी कार्ड काढण्याची फी विविध क्षेत्रांवर आधारित असते. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 135 रुपये, नगरपालिका किंवा नगरपंचायतीसाठी 90 रुपये, आणि ग्रामीण क्षेत्रात 45 रुपये शुल्क आहे.
प्रॉपर्टी कार्ड कसे वाचावे?
डिजिटल प्रॉपर्टी कार्डवर “मालमत्ता पत्रक” असा उल्लेख असतो. या कार्डात संबंधित गाव, तालुका, जिल्ह्याची माहिती, नगर भूमापन क्रमांक, मालमत्तेचे क्षेत्रफळ व मूळ मालकाची माहिती दिलेली असते. कार्डावर दिलेल्या सूचनांनुसार, हे कार्ड डिजिटल स्वाक्षरी असलेले असून, कोणत्याही प्रकारच्या शिक्क्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे कार्ड कायदेशीर आणि अधिकृत मानले जाते. या सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, आणि सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जाऊ शकते.
हेही वाचा:
• आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी होणार मोफत वीजपुरवठा; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का लाभ?
• राज्य सरकारचा मोठा निर्णय! उद्योगांसाठी ‘एनए’ परवानगीची अट रद्द; जमीन महसूल संहितेमध्ये सुधारणा