
डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी (For plans) हे कागदपत्र (Documents) आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये (In the Talathi office) हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात…
डिजिटल 8अ काढण्यासाठी प्रथम आपल्याला या लिंक वर जावे लागेल.
bhulekh.mahabhumi.gov.in
‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ (‘New user registration’) करण्याकरिता काय करावे?
जर तुम्ही प्रथमच ह्या वेबसाईटवर आला असाल यापूर्वी तुम्ही याचा लाभ घेतला नसेल तर प्रथम तुम्हाला ‘न्यू यूजर रजिस्ट्रेशन’ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
हेही वाचा : नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती करण्याकरता ‘या’ योजनेतून मिळवा अनुदान, असा करा, “ऑनलाईन” अर्ज…
या पर्यायावर क्लिक केल्यावर तिथे एक फॉर्म दिसेल
या फॉर्म मध्ये तुमची वैयक्तिक माहिती संपूर्ण नाव भरायचे आहे. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर द्या. अशी माहिती लिहा.
त्यानंतर Occupation म्हणजे तुमचा व्यवसाय उदाहरणार्थ शेती, व्यवसायिक, म्हणजेच तुम्ही काय करता, या पर्यायांची माहिती द्या.
यानंतर मेल-आयडी आणि जन्मतारखेचा रकाना भरा माहिती भरून झाल्यानंतर पत्त्याविषयी संपूर्ण व्यवस्थित माहिती भरा यामध्ये घर क्रमांक, गावाकडे राहात असाल तर ग्राउंड फ्लोअर, घरावर काही नाव असेल तर ते टाका.
त्यानंतर Pincode टाकायचा आहे. पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपोआप फॉर्मवर येईल.
त्यापुढे गल्लीचे नाव, गावाचे नाव, City तालुक्याचे नाव टाका. अशी संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहा
ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग आयडी तयार करायचा आहे.
लॉग-इन आयडी टाकला की त्यानंतर Check availability या पर्यायावर क्लिक करून तो आयडी अगोदरच अस्तित्वात आहे की नाही ते पाहा. तो जर नसेल तर त्यानंतर पासवर्ड टाका. त्यानंतर येथे दिलेल्या चार-पाच सोप्या प्रश्नांपैकी एकाचे उत्तर द्या.
हेही वाचा : लाखभर पगाराचं नोकरी सोडून द्राक्षाच्या शेतीमध्ये रमला राजीव यांची यशोगाथा…
त्यानंतर कॅप्टचा टाईप करायचा आहे. Captcha समोर दिसणारा कॅपच्या आहे तसा बरोबर लिहा.
शेवटी सबमिट बटण दाबा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन कम्प्लिट असा मेसेज येईल तेव्हा “क्लिक हिअर या पर्यायावर क्लिक करा. रजिस्ट्रेशन करताना टाकलेले यूजर नेम आणि पासवर्ड वापरून परत लॉग इन करा.
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर “Digitally Signed 8-A” हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता. या पर्यायावर क्लिक केलं की “डिजिटल स्वाक्षरीत 8-अ’ असे शीर्षक असलेले पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
हेही वाचा: महाराष्ट्र होणार सोमवार पासून अनलॉक! राज्य सरकारने जारी केली नवीन नियमावली…
जर तुम्ही यापूर्वी या वेबसाईटला भेट दिली असेल, म्हणजे सातबारा वगैरे काढला असेल जर तुमच्याकडे जुना लॉगिन आयडी असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता.
वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला उजवीकडे Digitally Signed 7/12 किंवा डिजिटल स्वाक्षरीत सातबारा पाहण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे नवीन पेज ओपन होईल,येथे डिजिटल स्वाक्षरीतला सातबारा, 8-अ आणि प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करू शकता.
वेबसाईटवर नोंदणी केली असेल, म्हणजे या अगोदर सातबारा उतारा काढला असेल तर लॉगइन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील इतर सेवांचा लाभ घेऊ शकता.
डिजिटल 8अ चा फायदा अनेक योजनांसाठी होतो,
याचाच अर्थ पीक कर्ज, पीक विमा आणि इतर अनेक शेतीसंबंधीच्या वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी डिजिटल सातबारा उतारा आणि 8-अ खाते उतारा अधिकृतपणे वापरू शकतात.
हेही वाचा :
1)येथे” मिळत आहे, 1 रुपयात साखर, बदाम, शुद्ध देसी तूप पहा; अजून काय आहेत भन्नाट ऑफर्स
2)पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करावी असे आवाहन डॉ. देवीकांत देशमुख यांनी केले…