कृषी तंत्रज्ञान

ऑनलाइन पद्धतीने सातबाऱ्यावरील चुका कशा दुरुस्त कराल?

How to correct mistakes on Satbari online?

सातबारा उतारामध्ये (7/12 उतारा ) अनेकदा नजरचुकीने चुका होतात व त्याचा व्यवहारात त्रास होतो, अशावेळी प्रत्येक वेळेस आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये जाण्याची गरज नसते, ऑनलाईन (Online) पद्धतीमुळे देखील दुरुस्त करता येतात, चलातर आपण या सदरात सातबारा मधील चुका दुरुस्त कशा करायच्या हे पाहू :

एखाद्या जमिनीची नोंदणी, वारस नोंदणी, (Heir registration) आकार, जमीन खरेदी विक्री,जमिनीवर बोजा चढवणे, जमिनीवर बोजा उतरवणे या संबंधित सरकारी कागद म्हणजेच जमिनीचा फेरफार. बराच वेळेस जमिनी खरेदी करताना फेरफार चेक केला जातो. यासाठी सरकारी कार्यालयांना (To government offices) हेलपाटे घालावे लागतात, अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात. पण आता मात्र सरकारने खास तुमच्यासाठी घर बसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सातबाराचा उतारा तुम्ही ऑनलाइन पद्धतीने घर बसल्या काढू शकता, हा सातबारा अचूक निघणे अत्यंत आवश्यक समजा नकळत काही चुका झाल्या असतील ऑनलाइन पद्धतीने त्या दुरुस्त करू शकतो.

वाचा : ‘अशा’ रीतीने करा कांद्याची साठवण; होणार नाही दोन वर्ष कांदा खराब !

सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी प्रथम आपणास, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल… https://bhulekh.mahabhumi.gov.in/

  • या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील उजव्या बाजूस इ-प्रणाली असे (The e-system was like this) लिहिले असेल,
    https://pdeigr.maharashtra.gov.in/
  • या लिंकवर गेले असता पब्लिक डाटा एन्ट्री नावाचे पेज ओपन होईल, तेथे प्रोसीड करून लॉगिन करा.
  • New user sign up करून आवश्यक ती माहिती भरा. दिलेली संपूर्ण माहिती जतन करून ठेवा.
  • लॉगिन (Login)केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, सातबारा दुरुस्ती करण्यासाठी 7/12 mutations पर्यायची निवड करा.
  • सामान्य नागरिक असलेल्या या बटनावर क्लिक केल्यास, तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल तुमच्या सातबारा मध्ये ज्या चुका आहेत त्या करण्यासाठी संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.

हे ही वाचा :

1. भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..

2. Technology : टेलिग्रामचे ढासू फीचर्स! एकाच वेळी 30 जणांशी व्हिडिओ कॉल वर बोलता येणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button