यंदाच्या वर्षी सोयाबीन (Soybeans) पिकाला चांगली तेजी आली होती, मात्र असे असले तरीही प्रतिकूल हवामानामुळे अलीकडील वर्षांत या पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव (Insect infestation) जाणवत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी सोयाबीन पिकाचे किडींपासून प्रभावी संरक्षण करणे गरजेचे झाले आहे.सोयाबीन पिकाचे नुकसान करणारी खोडमाशीवर नियंत्रण (Fly control) कसे मिळवावे, हा खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न असतो चला तर या सदरामध्ये आपण खोडमाशी वर नियंत्रण कसे मिळवावे हे पाहू
खोडमाशी (Scabies) या किडीमुळे उत्पादनात (In production) मोठ्या प्रमाणात घट होते या किडीमुळे सोयाबीनचे शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते सोयाबीन बरोबरच ही खोडमाशी मूग, उडीद, तूर, चवळी या पिकांवर देखील आढळते.पिकाचे रोप अवस्थेत झाल्यास झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे पिकाची पुनर्पेरणी करावी लागते.
खोडमाशी आकाराने लहान, चमकदार काळ्या रंगाची असते. खोडमाशीची मादी पानामध्ये वरच्या बाजूस अंडी घालते. अंड्यातून दोन ते तीन दिवसात आळ्या बाहेर पडतात.
अळी पान पोखरून शिरेपर्यंत पोचून शिरेतून पानाच्या देठामध्ये, खोडामध्ये शिरते. अशा प्रकारे अळी आतील भाग खात जमिनीपर्यंत पोचते. झाड मोठे झाल्यावर वरून या किडीचा प्रादुर्भाव जाणवत नाही. फक्त जमिनीजवळ खोडातून प्रौढ माशी (Adult fly) निघाल्यास खोडाला छिद्र दिसते, त्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात.
उपाय योजना (Measure plan)
खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दिसत असल्या मुळे पाहिल्या 10 ते 15 दिवसात उपाय योजना करावी लागते. सुरुवातीला फोरेट (10 टक्के दाणेदार) 15 किलो प्रतिहेक्टर जमिनीत मिसळून द्यावे. सोयाबीन पेरणीनंतर प्रथम आंतर प्रवाही कीटकनाशक अर्थात थायमिथोक्झान 12.6 टक्के अधिक लाम्ब्डा सायहलोथ्रीन 9.5 टक्के यांची फवारणी घ्यावी. तसेच दूसरी फवारणी क्लोरानद्रनिप्रोल 18.5 टक्के मिली 10 लिटर पाण्यात किंवा इंडोक्साकार्य 15.8 टक्के ईसी हे 6.7 मिलि याप्रमाणे करावी.
हे ही वाचा :
कृषीसेवा केंद्र कसे चालू कराल व त्या संबंधीच्या अटी व पात्रता वाचा सविस्तर माहिती
मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना ‘हे’ एप्लीकेशन ठरणार वरदान! पहा एप्लीकेशनचे वैशिष्ट्य