कपाशीवर (On cotton) अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो त्यामध्ये प्रामुख्याने मावा, पांढरी माशी, तुडतुडे (Aphids, whiteflies, thrips) यासारख्या किडींचा (Of insects) प्रादुर्भाव दिसून येतो यामुळे कपाशीच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट देखील होते त्यामुळे कपाशी वरील तुडतुडे किडींवर वेळीच उपाययोजना (Measures),केल्यास प्रतिबंध बसू शकेल. चला तर या सदरामध्ये आपण तुडतुडे या किडींवर काय उपाय योजना कराव्यात हे पाहू
प्रौढ तुडतुडे पाचरीच्या आकाराचे फिक्कट हिरव्या रंगाचे दोन ते चार मी. मी लांब असतात.पिल्ले प्रवडा सारखेच फिक्कट हिरव्या रंगाचे व त्यांना पंख नसतात.
तुडतुडे यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते चालताना तिरके चालतात व चटकन उडी मारतात. तसेच तुडतुडे किडे रस शोषून घेतात त्यामुळे उत्पादनामध्ये घट निर्माण होते. तुडतुडे किडे पानाच्या खाली असल्याकारणाने, पानांचा रस शोषून घेत असताना विषारी द्रव्य सोडत (Releasing toxic substances) असतात त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियावर (On photosynthesis action) परिणाम होतो.
हे ही वाचा : आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!
कपाशीच्या पिकांवर तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने तपकिरी रंगाचे होतात, तसेच त्याच्या कडा ही पिवळ्या होतात व पाने मुरगळतात.
झाडे लहान असताना या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांची वाढ खुंटते तसेच पाने वाळून गळून पडतात. पाते, फुले व बोंडे या बागांवर किड्यांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात घट होते तसेच काही वेळा झाडे हि वाळून जातात.
तुडतूड किडींवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवाल
कपाशीवर योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा द्याव्यात परंतु त्याचा अतिरेक टाळावा. कपाशी लागवड करताना योग्य अंतर ठेवणे देखील गरजेचे आहे. कपाशीची बी निवडताना प्रतिकारक्षम वाणाची निवड करावी. कपाशीचा हंगाम संपल्यानंतर पिकाचे अवशेष जमा करून त्यांचा नायनाट करावा.
कपाशीचे बियाणे लागवड करताना त्यामध्ये आंतरपीक (Intercrop) घ्यावी, यामध्ये आपण चवळी,मुग, उडीद यासारखे कडधान्यचे लागवड केल्यास फायद्याची ठरेल तसेच नुसकान देखील टाळले जाईल.
सुरुवातीच्या काळात रासायनिक कीटकनाशकांची (Chemical pesticides) फवारणी करू नये. शक्य झाल्यास दर वर्षी पीक फेरपालट करणे योग्य ठरेल.
पानाच्या कडा मुरडलेल्या, पिवळसर झालेली आढळल्यास कीटकनाशकाची फवारणी करावी. निंबोळी अर्क पाच टक्के किंवा ऍझाडीरॅक्टिन (1000 पी पी एम ) एक मिली किंवा (1500 पी पी एम ) hh2.5मिली.फ्लोनिकामिड (50डब्ल्यू जी.) 0.2 ग्रॅम
लागवड केल्यानंतर 60 दिवसाने रासायनिक कीटकनाशकांचा (Of chemical pesticides) वापर करणे फायद्याचे ठरते रासायनिक कीटकनाशकाची वारंवार फवारणी करू नये, तसेच कीटकनाशकाची फवारणी करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक (Expert advice is required) आहे.
हे ही वाचा :