आरोग्य

वेडीवाकडी असणारे आले अंत:रंगाने किती आहेत बहुगुणी? वाचा’ हे ‘आल्याचे’ गुणधर्म:

How many ginger hearts are there? Read 'This' Properties:

आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे व खनिजे समाविष्ट झाली आहेत. आल्या मध्ये प्रतिकार शक्ती तसेच भूक वाढवण्याकरता देखील उपयुक्त आहे , आल्यामुळे कफचा देखील नाश होतो. आले पासून विविध पदार्थ देखील तयार होतात जसे की सिरप सुपारी, आलेवडी, सुंठ, आले-लसूण पेस्ट, कॅंडी, आल्याचे लोणचे असे विविध पदार्थ देखील तयार होतात व त्यातून ही आपल्याला उत्कृष्ट व्यवसाय करता येतो.

व्यवस्थित मार्केटिंग व्यवस्थापन केल्यास यामध्ये आपल्यात भरपूर नफा देखील मिळतो. चला तर या बहूपयोगी आले असे गुणधर्म आपण पाहूयात:

✍️आले मध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याची क्षमता असते. सर्दी खोकला यावर रामबाण उपाय म्हणून देखील याकडे पाहिले जाते.

✍️उलटी येत असल्यास आल्याचा रस मधासोबत किंवा खडीसाखर सोबत खाल्ल्यास फायदेशीर ठरतो.

✍️आल्या पासून बनवण्यात येणारे सुंठ गरम पाण्यामध्ये पिल्यास लठ्ठपणा म्हणजेच वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतो परंतु उन्हाळ्यामध्ये हा उपाय करू नये यामध्ये भरपूर प्रमाणात असते

✍️लहान मुलांच्या सर्दी खोकला किंवा सर्दीमुळे नाक बंद होणे या आजारावर देखील आले गुणकारी ठरते.

✍️सांधेदुखीचा त्रास होत असल्यास सांध्यांवर आले व गूळ एकत्र करून लावल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

✍️एखाद्या व्यक्तीस दमा असल्यास सुंठ सोबत मधाचा वापर करून चाटण खाल्ल्यास दम्यावर गुणकारी ठरते.

✍️जर एखाद्या व्यक्तीस व्यवस्थित भूक लागत नसेल तर आले चे सेवन केल्यामुळे भूक वाढ होण्यास मदत मिळते.

✍️गॅस झाल्यामुळे अनेकदा पोटात दुखते त्यावेळेस कोमट पाण्यात सुंठ पिल्यास गॅस बाहेर पडून पोटाला आराम मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button