सद्यस्थितीत जनवारांना लाळ्या व खुरकुत हा आजार होण्याची शक्यता आहे. त्याच्या नियंत्रणासाठी (For control) लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना केल्यास उपयुक्त ठरते चला तर आपण पाहूया जनावरांमध्ये आढळणाऱ्या या रोगाची लक्षणे
लक्षणे :
जनावरांच्या तोंडामध्ये तसेच दोन खुरांच्या आतमध्ये फोड येतात.
तोंडात झालेल्या जखमांमधून स्राव निघतो. तो लाळेसारखा सतत गळत राहतो.
जनावरे चारा खात नाहीत, जनावर मलुल राहते.
जनावराच्या तोंडात फोड तयार झाल्यावर शरीराचे तापमान कमी होते.
दुधाळ गाई, म्हशींच्या दुग्धोत्पादनात (In dairy production) घट दिसून येते.
जनावरांमध्ये हा आजार का होतो याची प्रमुख कारणे कोणती हे आपण पाहू या
प्रसाराची कारणे :
जनावरांच्या तोंडामध्ये जखमा झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी पायाच्या खुरात जखमा होऊ लागतात. त्या मोठ्या होऊन त्यातून स्राव बाहेर पडतो.
जनावराचे तोंड आणि पायातील चिकट स्राव बाहेर पडत असतो. या स्रावामध्ये रोगकारक विषाणू असतात. हा स्राव चारा आणि पाणी यामध्ये मिसळल्याने रोगाचा प्रसार झपाट्याने होता.
जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास जनावराचे खूर गळून पडतात. अशी जनावरे लंगडतात.
खूर गळून पडलेली जनावरे एका ठिकाणी शांत बसून राहतात.
जनावरांचे सड सातत्याने ओले राहत असतील तर सड आणि कासेरवर रोगाचे फोड दिसतात.
उपाय योजना :
यामध्ये काही उपाययोजना सांगण्यात आले आहेत, तरीदेखील या उपाययोजनांचा अवलंब करताना वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे,
बोरिक ॲसिड (Boric acid) पावडर १५ ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात मिसळावी. या द्रावणाने तोंडातील जखमा धुवाव्यात.
एक ग्रॅम पोटॅशिअम परमॅगनेट प्रति तीन लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणाने सलग ५ ते ६ दिवस दररोज चार वेळेस जखमा धुवाव्यात.
जखमांवर जंतूनाशक मलम लावावे.
गोठ्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव असेल तर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ते दोन महिने लागू शकतात.
सांसर्गिक रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्याने प्रतिजैविकांची मात्रा द्यावी.
पावसाळ्याच्या पूर्वी जनावरांना लसीकरण करणे आवश्यक आहे.
सध्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर तातडीने निरोगी जनावरांना पशुवैद्यकाकडूनच प्रतिबंधात्मक लसीकरण करावे.
हेही वाचा :
2)कोरोना काळामध्ये शेतीविषयक अडचण निर्माण झाल्यास कोठे संपर्क साधावा??