ताज्या बातम्या

अंतराळवीरांच्या रक्तापासून मंगळावर बनणार घरे; काँक्रिटच्या विटांपासून बनवणार कॉलनी..

अनंत आमुची ध्येयासक्ती म्हणत मानवाने आता मंगळावर (mars) वस्ती निर्माण करायची योजना बनवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळावर कॉलनी (Colony on Mars) तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या काँक्रिटच्या विटांची (concrete bricks) निर्मिती करण्यात येत आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया..

वाचा –

रक्त, घाम आणि अश्रूपासून काँक्रिटची निर्मिती –

मॅन्चेस्टर विद्यापीठातील (University of Manchester) वैज्ञानिकांनी (scientists) आता धुळीच्या, मातीच्या सोबत अंतराळवीरांच्या रक्त, घाम आणि अश्रूपासून एक विशिष्ट पद्धतीच्या काँक्रिटची (Concrete) निर्मिती केली आहे. या काँक्रिटच्या (Concrete) विटांपासून मंगळावर एक कॉलनी निर्माण करण्याची योजना आखली जात आहे. मंगळावर एक विट घेऊन जायचं म्हटलं तर जवळपास 1500 कोटी रुपयांचा खर्च आहे असं सांगितलं जातं.

त्यामुळे पृथ्वीवरुन साहित्य घेऊन जाणे आणि मंगळावर कॉलनी तयार करणे हे किती महागात पडू शकतं हा विचार न केलेलाच बरा. मग यावर वैज्ञानिकांनी उपाय काढला आहे. तो म्हणजे विटा तयार करण्यासाठी मंगळावरची धूळ आणि तिकडे गेलेल्या अंतराळवीरांचे रक्त, घाम आणि अश्रूंचा वापर करायचा आणि काँक्रिट (Concrete) तयार करायचं.

वाचा –

मानव आपली कॉलनी उभा करू शकतो –

एका अभ्यासात असे सिद्ध झाले आहे की मानवाच्या रक्तातील प्रोटिन्स ज्याला ह्यूमन सिरम अल्ब्युमिन (Human Serum Albumin) म्हटलं जातं, ते युरियासोबत (मानवाच्या रक्त, लघवी, घाम आणि अश्रूमध्ये सापडणाऱ्या) आणि मंगळावर सापडणाऱ्या माती किंवा धुळीसोबत मिसळलं असता काँक्रिटहून अधिक मजबूत मटेरियल तयार होतं. त्यामुळे मंगळासारख्या (Mars) ग्रहावर, ज्या ठिकाणी पाणी सापडलं नाही, त्या ठिकाणी मानव आपली कॉलनी उभा करु शकतो. संशोधकांनी दावा केलाय की, अशा प्रकारे मंगळावर सहा अंतराळवीर सलग दोन वर्षे काम करुन 500 किलोचे काँक्रिट तयार करु शकतात. त्यामुळे या पुढच्या काळात मंगळावर कॉलनी उभा करता येऊ शकते आणि त्याचा वापर अंतराळवीरांसाठी केला जाऊ शकतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button