ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

फळबाग शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ! पात्रता आणि योजना जाणून घ्या…

असंख्य शेतकरी पारंपरिक शेतीकडून फळबाग आंकडे वळण घेत आहे. पारंपारिक शेतीमध्ये काही प्रकारची कमाई मिळत नसल्यामुळे हा कल वाढतोय फळबागांमध्ये शेतकऱ्यांना ताई प्रकारची कमाई मिळते.फळबागांच्या उत्पादनातून शेतकऱ्याला खूप मोठा आर्थिक फायदा होतो, त्यामुळे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना फळबाग आंकडे करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांनी फुलबाग फळबाग क्षेत्राकडे वळावे यासाठी राज्य कृषिमंत्री दादाजी भुसे ही आग्रही आहेत. फळबागेसाठी सरकार सुद्धा आर्थिक मदत करते आणि यासाठी योजनाही राबवली जाते 1990 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यभरात राबवली जात आहे.

योजनेसाठी पात्रता…

योजनेकरिता पात्र राहण्यासाठी शेतकऱ्यांची स्वताच्या नावावर सातबारे असणे अत्यावश्यक आहे. तसेच या योजनेसाठी प्रत्येक शेतकऱ्याचे लाभार्थ्याचे संमतीपत्र गरजेचे असते. जर सातबारावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र लागतं. या योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची उपजीविका ही फक्त शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते आणि त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार केला जात . किमान०.२० व कमाल ६.०० हेक्टर पर्यंत जमीन असल्यास या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. विशेष म्हणजे या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचे शंभर टक्के अनुदान मिळते ज्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः जवळचा पैसा गुंतवण्याची गरज भासत नाही.

कसे मिळेल अनुदान?

फळबागांसाठी अनुदान हे तीन टप्प्यात मिळतं ते तीन टप्पे प्रत्येकी वर्षे असतात. पहिल्या वर्षी 50 टक्के तर दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि शेवटचा टप्पा म्हणजे तिसऱ्या वर्षी 20 टक्के याप्रमाणे या योजनेचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो.

कुठून मिळणार रोप?

फळबाग लागवड कालावधी हा जून ते मार्च या दरम्यान चा मानला जातो. या योजनेनुसार शेतकऱ्याला हव्या त्या फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड आपल्या शेतीमध्ये करता येते.शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी कृषी विद्यापीठ रोपवाटिका व राष्ट्रीय बागवानी मंडळामार्फत, नामांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक रोपवाटिकांमधून फळबागांसाठी कलमा खरेदी करता येतात ज्यांची पेरणी ते आपल्या शेतात करू शकतो. शेतकऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतरच फळबाग करावी लागते.

WEB TITLE: Horticulture Fundkar Horticulture Scheme for children living in rural areas! Name the days of eligibility and plans…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button