ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
राशिभविष्य

Horoscope | 500 वर्ष नंतर दिवाळीवर तीन राशींना होणार मोठा लाभ! जाणून घ्या कोणत्या राशी आहेत भाग्यशाली?

Horoscope | After 500 years, three zodiac signs will get big benefits on Diwali! Know which zodiac signs are lucky?

Horoscope | वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र हा प्रेम, आनंद आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह आहे. शुक्र देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करताना त्याच्यासोबत अनेक राजयोग निर्माण होतात. यापैकी एक राजयोग म्हणजे नीचभंग राजयोग. या राजयोगामुळे अनेक (Horoscope) राशींना शुभ फळ मिळतात.

यावर्षी शुक्र देव कन्या राशीत प्रवेश केला आहे. यावेळी तूळ राशीत सूर्य देव विराजमान आहेत. त्यामुळे शुक्र आणि सूर्य यांच्यामध्ये नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग तब्बल 500 वर्षांनी निर्माण झाला आहे.

या राजयोगामुळे तीन राशींना विशेष लाभ होणार आहे. या राशी म्हणजे कन्या, कर्क आणि मकर.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्रदेव तुमच्या कुंडलीत चढत्या घरात असणार आहे. तर सूर्य तुमच्या धन गृहात फिरणार आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार असून तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नीचभंग राजयोग हा लव्ह लाइफसाठीही उत्तम असणार आहे.

वाचा : Buy Gold in Diwali | दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात? ही बातमी तुमच्यासाठी आहे!

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग आर्थिक प्रगतीची ठरणार आहे. शुक्र तुमच्या राशीतून तिसऱ्या भावात तर सूर्य देव चौथ्या भावात फिरणार आहे. त्यामुळे धैर्य, शौर्य वाढणार आहे. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचा शुभ योग आहे. सुख सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग शुभ सिद्ध ठरणार आहे. शुक्रदेव तुमच्या राशीतून नवव्या भावात तर सूर्य दहाव्या भावात असणार आहे. तुम्हाला या योगामुळे नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरी व्यवसायात घवघवीत यश तुम्हाला मिळणार आहे. या योगामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. जमीन आणि वाहन खरेदीचे योग आहे. सुख सुविधांमध्ये वाढ होणार आहे. व्यवसायात प्रगती होईल.

या राजयोगामुळे दिवाळीवर या राशींना होणारे विशिष्ट लाभ

  • कन्या राशी: या राशीच्या लोकांना दिवाळीवर नवीन नोकरी, पदोन्नती, व्यवसायात वाढ, आर्थिक लाभ, प्रेम विवाह, मुलबाळांचा जन्म यासारख्या शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.
  • कर्क राशी: या राशीच्या लोकांना दिवाळीवर नवीन व्यवसाय सुरू होणे, मालमत्ता खरेदी, परदेश प्रवास, कुटुंबात आनंदाची वाढ, नोकरीमध्ये पदोन्नती यासारख्या शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.
  • मकर राशी: या राशीच्या लोकांना दिवाळीवर नोकरीमध्ये बढती, आर्थिक लाभ, व्यवसायात वाढ, नवीन घर खरेदी, लग्न, मुलबाळांचा जन्म यासारख्या शुभ घटना घडण्याची शक्यता आहे.

अर्थात, या राजयोगांचा लाभ घेण्यासाठी या राशीच्या लोकांनी योग्य पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच, आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत.

हेही वाचा :

Web Title : Horoscope | After 500 years, three zodiac signs will get big benefits on Diwali! Know which zodiac signs are lucky?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button