इतर

उच्च न्यायालय चा निर्णय: विवाहित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवत असेल तर तो गुन्हा म्हणता येणार नाही; वाचा सविस्तर निर्णय..

High Court decision: If a married person is in a relationship with another person - it cannot be considered a crime; Read detailed decision ..

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab and Haryana High Court) एका महत्त्वपूर्ण निर्णयावर सुनावणी करताना म्हटले आहे की, प्रेमी जोडप्यांपैकी (Love Couple) कोणीही एक जरी विवाहित असलं तरी त्यांना सुरक्षा (Security) देणं नाकारता येणार नाही.

या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने खन्नाच्या एसएसपीला प्रेमी जोडप्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आदेश जारी केले आहेत. न्यायालयाने म्हटले की, संविधान प्रत्येकाला जीवन आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणचे अधिकार देते. याचिका (Petition) दाखल करून, जोडप्याने उच्च न्यायालयात सांगितले की प्रियकर आधीच विवाहित आहे आणि त्याचा घटस्फोट उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

वाचा: तब्बल ३०० च मायलेज: पेट्रोल-डिझेल पासून सुटका, सर्वसामान्यांना देखील परवडणारी आली इलेक्ट्रॉनिक कार..

प्रेमी जोडपे सहमतीच्या नात्यात आहेत आणि याचिकाकर्त्याची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून दाम्पत्याच्या जीवाला धोका आहे. प्रेमी जोडप्याने सांगितले की पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, समराळाचा SHO तिला सतत त्रास देत आहे.

वाचा: केंद्राचा मोठा निर्णय; मोहरी, मसूर, गहू सहित सर्व रब्बी पिकांच्या “किमान आधारभूत किमती जाहीर”, 400 रुपयांनी वाढवल्या किमती..

सर्वोच्च न्यायालयाने IPC चे कलम 497 असंवैधानिक म्हणून घोषित –

सुनावणीदरम्यान, अनिता आणि इतर विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यांच्याशी संबंधित अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता, ज्यात न्यायालयाच्या वतीने असे म्हटले होते की जर दोघांपैकी कोणी एक आधीच विवाहित असले तरी त्यांना सुरक्षा दिली जाऊ शकत नाही. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले की ते अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करते परंतु या आदेशाशी सहमत नाहीत. न्यायालयाने म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने IPC चे कलम 497 असंवैधानिक म्हणून घोषित केले आहे आणि अशा परिस्थितीत प्रेम करणाऱ्या जोडप्याला संरक्षण नाकारता येत नाही.

वाचा: SBI Alert : बँकेतील आपला डेटा चोरीला जावू नये म्हणून घ्या ‘ही’ दक्षता…

संमतीने एकत्र राहण्यास तयार असतील तर तो गुन्हा म्हणता येणार नाही –

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, जोडप्याने सहमतीने संबंध ठेवणे कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर नाही. जर कोणी संमतीने एकत्र राहण्यास तयार असतील तर तो गुन्हा म्हणता येणार नाही. उच्च न्यायालयाने या प्रकरणी पंजाब सरकार आणि इतरांना नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागवले आहे.

वाचा: वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button