पशुसंवर्धन

अशी करा शेततळ्यामध्ये “मत्स्य शेती” व अशी घ्या “मत्स्यशेती” ची काळजी…

Here's how to do "fish farming" on a farm and take care of "fish farming" "

महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये शेततळे मोठयाप्रमाणात तयार होत असून या शेततळयाचा वापर मत्स्य शेतीसाठी करता येतो.मत्स्यशेती म्हणजे तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केल्या गेलेली माशांची पैदास होय.ही माशांची पैदाससाठी त्यासदृष्य स्थिती निर्माण केल्या जातात. मासे उत्पादन करुन त्या पासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.


मस्य जाती :


मत्स्यपालन गोड्या पाण्यातील शेततळे मध्ये केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्य माशांचे चंदेरा, गवत्या, सायनस या माशांचा संवर्धनासाठी उपयोग केला जातो.


मत्स्यपालनातून मिळणारा फायदा:


या माशाचा संवर्धन काळ दहा महिने इतका असतो. या कालावधीमध्ये माशीची वाढ एक किलो पेक्षा जास्त होऊ शकते.
मत्स्य शेती करताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बारमाही पाणी असणे आवश्यक आहे. तसेच मत्स्यबीज हे चांगलं कॉलिटी असणे आवश्यक आहे. मत्स्य पालना मध्ये आपणास कमी वेळेत भरपूर नफा कमावता येतो.


शेततळ्यामध्ये मासे पालन करताना शेतकऱ्यांना फायदा होतो तो म्हणजे शेतीसाठी पाणी देखील उपलब्ध होते व मत्स्य पालन व्यवसाय देखील होतो. त्यामुळे दुहेरी आर्थिक लाभ मिळतो.


लागवड:


खते व्यवस्थापनानंतर १५ दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यासाठी साधारण १० से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी ५००० याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावेत. बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता ३–४ किंवा ६ प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे शक्य आहे.


मत्स्य पालन करताना घ्यायची काळजी :


१) मत्स्य पालन करताना शेततळ्यांमध्ये खेकडे, वाम, बेडूक, असे भक्षक प्राणी आत मध्ये येणार नाही याकडे लक्ष द्यावे.

२) शेततळ्यामध्ये मासे काढणे करता पायऱ्यांची सोय करावी.

३) शेततळ्यामध्ये माशांसाठी खद्य व्यवस्था चांगल्या प्रकारे करावी.

४) मातीची शेततळे असल्यास माशांची विष्ठा, माशांचे खाद्य त्याचे विघटन होत असते परंतु प्लास्टिक कागद असणाऱ्या शेततळ्यामध्ये अशा गोष्टी चे विघटन होत नाही त्यामुळे पाणी लवकर खराब होते त्याकरिता पाणी खराब झाल्यास बदलण्याची योग्य सोय करावी.

५) पावसाळ्यामध्ये शेततळे भरून जातात, अशा वेळी शेततळी ओव्हरफ्लो होऊन मासे वाहून जाणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

६) जनावरे किंवा अन्य कारणामुळे शेततळ्यातील प्लास्टिकचा कागद फाटणार नाही याकडे लक्ष द्यावे.

हे ही वाचा :
१) नगरच्या कृषी उत्पन्न समिती मध्ये मिरचीच्या दराचा ठसका पहा : लाल मिरची ,लवांगी मिरची, बेडगी मिरचीला किती आलाय दराला रंग…
२) हवामान अंदाज: येत्या तीन दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button