योजना

असा करा ‘ड्रॅगन फ्रुट लागवड’ अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज…

Here's how to apply for a 'Dragon Fruit Plant' grant online

राज्य सरकारने एकात्मिक फलोत्पादन धोरणांतर्गत (Under the Integrated Horticulture Policy) ड्रॅगन फूड अनुदान योजना राबवण्यात आलेली आहे. ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारे हे फळ आहे. परंतु ड्रॅगन फ्रुट लागवड करतात पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो सर्वसाधारणपणे एकरी दोन लाख रुपये खर्च होण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी या फळबागेकडे (To the orchard) वळत नाहीत याकरिता राज्य सरकारने ड्रॅगन फूड लागवडीकरता अनुदान जाहीर केले आहे.
ड्रॅगन फूड लागवडीकरता हेक्‍टरी एक लाख 60 हजार रुपये अनुदान दिले जाते.
त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने (Online) अर्ज कसा करावा हे आपण पाहणार आहोत.

हे ही वाचा: केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी होते पुरस्कारांची बरसात! तुम्हीही होऊ शकता लाभार्थी!…

यासाठी आपणास महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal).वर जाण्याची आवश्यकता आहे. किंवा खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून देखील तुम्ही जाऊ शकता.
https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

या ठिकाणी आपणास आपला युजर आयडी पासवर्ड (User ID Password) टाकायचा आहे, आपला युजर आयडी पासवर्ड नसेल तर तो तयार करणे आवश्यक आहे.

कॅपच्या कोड भरून आपणास लॉगिन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ दिसेल, त्याद्वारे राज्य सरकारचे योजना दिसतील, जसे की अवजारासाठी ज्या योजना आहेत त्या, ठिबक सिंचनाचे योजना, अशा विविध योजना दिसतील, यामध्ये तुम्हाला ‘फलोत्पादन'(‘Horticulture’) नावाचा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला फलोत्पादन अर्जावरील संपूर्ण माहिती भरावी लागेल.

हे ही वाचा: सोयाबीनचे पिकाबरोबर घ्या, ‘हे’ आंतरपीक आणि मिळवा लाखो रुपयांचा फायदा!

हा अर्ज भरत असताना, एकात्मिक फलोत्पादन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे, फळ निवडा अंतर्गत सीताफळ, जांभूळ असे विविध फळांचे ऑप्शन दिले जातील, त्यामध्ये तुम्हाला ड्रॅगन फ्रुट नावाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

अर्ज भरून दिल्यानंतर मी अर्ज केलेले बाबींवर जाऊन छाननी अंतर्गत बाबींचा समावेश न झाल्याने ते दाखवत नाहीत. त्यासाठी पुन्हा तुम्हाला मुखपृष्ठावर जावे लागेल

व तुम्ही निवडलेल्या बाबीची पूर्तता करावी लागेल. तसेच योजने बाबीचा अटी-शर्ती मला मान्य आहे, या गोष्टीवर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.अशाप्रकारे ड्रॅगन फ्रुट या फळ लागवडीसाठी तुम्ही शासकीय अनुदान मिळू शकतात. कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न मिळवू शकता.

हे ही वाचा:

तुमच्या जनावरांना गोचीड असल्यास सुटका मिळवण्यासाठी असे करा प्रतिबंधात्मक उपाय..

अहमदनगर’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ‘कृषी सिंचन योजनेअंतर्गत’ 5 कोटी 79 लाख रुपयांचे अनुदान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button