ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

शेतजमिनीच्या 7/12 मध्ये झाले हे मोठे 11 बदल, जाणून घ्या कोणकोणते बदल केले आहेत.

Here are the 11 big changes that took place in 7/12 of farmland, find out what changes have been made.

तुम्हाला माहीत आहे का ? महाराष्ट्रामध्ये सातबाऱ्यामध्ये एकूण ११ बदल करण्यात आले आहेत आणि हे १ ऑगष्ट २०२१ पासून लागू झाल्याचे सांगितले आहे.

कोणकोणते बदल झालेत आपण पाहूया –

  • गाव नमुना-7′ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच ( Local Government Directory) टाकण्यात येणार आहे.
  • लागवडीचे योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद केले जाईल
  • शेती (Indian farmers) क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती (Indian farmers) क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे.
  • जुने फेरफार गाव नमुना-7 मधील क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दाखवले जातील.
  • खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात होता आता खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.
  • मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जाणाऱ्या आता त्या कंस करून रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवल्या जाणार.
  • दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची स्पष्ट दिसतील.
  • तारीख गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा शेवटचा व्यवहार, ही माहिती शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक समोर नमूद केले जाईल.
  • जे फेरफार प्रलंबित आहेत, ते स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ नोंदवले जातील.
  • बिनशेतीच्या सात बारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button