पावसाचा जोर कायम; काय आहे पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज? पहा सविस्तर..
गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. पुढील ५ दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २५ सप्टेंबरपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील 5 दिवसांचे हवामान अंदाज पाहुया..
वाचा –
पुढील हवामानाचा अंदाज-
24 सप्टेंबर – कोकण गोवा याठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला
25 सप्टेंबर – कोकण गोवा याठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
26 सप्टेंबर – कोकण गोवा याठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
वाचा –
27 सप्टेंबर – कोकण गोवा याठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
28 सप्टेंबर – कोकण गोवा याठिकाणी बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भातही बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.
हे ही वाचा –