ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान
ट्रेंडिंग

महाराष्ट्रात “या” ठिकाणी मोठा पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा सोबत सावध राहण्याचा इशारा…

Heavy rains in "this" place in Maharashtra; Warning to farmers to be careful with relief ...

पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने (weather department) दिलेली आहे. मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला होता आता पुन्हा पावसाचे दिवस सुरू होण्याचे दिसत आहेत. 20 ते 26 ऑगस्ट या आठवड्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, आणि मराठवाडा मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. यामध्ये 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ज्यामध्ये मराठवाड्यात सर्वात जास्त आणि मोठ्या पावसाची शक्यता असल्याची सांगितले आहे.

शेतकऱ्यासाठी दिलासा दायक असला तरी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पुढचे 3 आठवडे चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे याबरोबर कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने बांधलेला आहे. अरबी समुद्रात देखील वाऱ्याचा प्रचंड वेग सांगितलेला आहे. त्यामुळे या भागातील लोकांना सावध केलेलं आहे. मुंबईत व इतरत्र भागांमध्ये देखील पाऊस रिपरिप चालू आहे.

वाचा : मोठी बातमी, ठाकरे सरकार ने केली “या” बॅंकेची तब्बळ 248 कोटींची कर्जमाफी, पहा ते बँक कोणती..

वाचा : मध्यम वर्गीय शेतकरीही होणार कार चा मालक ! शेतकऱ्याला मिळणार कमी व्याजदराने टाटा कार..

पाऊस पुन्हा सुरू होत असल्याने शेतकऱ्याचे डोळे पावसाकडे लागून राहिलेले आहेत.पिकांना बहर येईल लागवडी पेरणी चांगल्या होतील या आशेवर पुन्हा शेतकरी टिकून राहिले आहेत. याचबरोबर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागात मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या भागातील लोकांनी सावध राहिले पाहिजे अति पावसाने बऱ्याच शेतकरी लोकांची नुकसान होतात त्यांनीही (to stay safe) सावध राहिले पाहिजे. मोठ्या पावसाचं प्रमाण असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे.

बाकी जिल्यांमध्ये रिपरिप पाऊस सुरू आहे. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात त्याचबरोबर धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मोठया पावसाची शक्यता सांगीतली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button