हवामान

Unseasonal Rain Update | अरे देवा उन्हाळ्यात पाऊस! आजुन राज्यात किती दिवस चालणार हा अवकाळी पाऊस?

Unseasonal Rain Update |
आता सध्या महाराष्ट्रातात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain)पडत आसून त्यात आता मुंबईतही (Mumbai Rain Update) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. त्यात सुखद बाब म्हणजे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना आता या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अचानक कोसळणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत सध्या मोठी भर पडली आहे. तसेच या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या (farmer) हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या सध्याचा माहितीनुसार, राज्यात आणखी तीन-चार दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात येत असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने (Rain) थैमान घातले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने सध्या राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

वाचाब्रेकिंग! ‘या’ जिल्ह्यातील कृषी यांत्रिकीकरणाचे तब्बल 4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, त्वरित तपासा

तसेच हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की राज्यातील विदर्भामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगडपर्यंत विस्तारला आहे. यामुळे विदर्भासह मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचाशेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ ताखेला खात्यात जमा होणार पीएम किसानचा 13वा हप्ता; त्वरित जाणून घ्या

तसेच काही दिवसापूर्वी राज्यभरात झालेल्या या अवकाळी पावसामुळे 25 जिल्ह्यांतील 1 लाख 39 हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झाले आहे. तर पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी तसेच बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यासह परभणीत जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच परभणी, अकोला, बुलढाणा, सातारा, धुळे, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातही पाऊस झाला आहे. याचप्रमाणे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व भागात देखील पाऊस सुरू आहे. याचप्रमाणे दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात देखील मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली दिसून आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Oh god summer rain! How many days will this unseasonal rain last in the state?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button