ताज्या बातम्या

Heavy Rain Crop Damage | अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडे बधितांसाठी १४ कोटींची मागणी

Big loss to farmers in 'Ya' district due to heavy rains; Demand of 14 crores for the disabled from the government

Heavy Rain Crop Damage | यंदाच्या जून व जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील २७ हजार ७४२ शेतकऱ्यांच्या १६ हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १४ कोटी ५४ लाख २८ हजार २०० रुपये एवढ्या निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

वाचा : Crop Damage Compensation | आनंदाची बातमी! अतिवृष्टीचा तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांचा निधी 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

जून,जुलै महिन्यात कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या चार तालुक्यांतील अनेक मंडलात अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांच्या पुरांचे पाण्यात पिके बुडाली. जमिनी खरडून गेल्या. या चार तालुक्यांतील पेरणी केलेल्या ४२ हजार २३४ हेक्टर पैकी जिरायती क्षेत्रातील १६ हजार ८९ हेक्टर, बागायती क्षेत्रातील ५१० हेक्टर असे मिळून एकूण १६ हजार ५९९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा प्रशासनाने या निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारकडून निधी मंजूर झाल्यास बाधित शेतकऱ्यांना मदत मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big loss to farmers in ‘Ya’ district due to heavy rains; Demand of 14 crores for the disabled from the government

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button