पशुसंवर्धन

आरोग्यवर्धक शेळीचे दूध: शेळीच्या दुधापासून ‘ हे ’ फायदे आहेत..

Healthy Goat's Milk: There are 'these' benefits from goat's milk.

शेळीचे दूध खूप आरोग्यवर्धक असते. तसेच ते पचायला हलके देखील असते. शेळीचे दूध मूल्याच्या दृष्टीने औषधी समजली जाते. परिपूर्ण सकस आहार म्हणून शेळीच्या दुधाचे महत्त्व आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये शेळीच्या 27 प्रकारच्या जाती आहेत. देशी शेळी एका वेतात साधारणपणे 60 लिटर दूध देते. महाराष्ट्र राज्यात उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी प्रसिद्ध आहे. सानेन सारख्या विदेशी जातीपासून एका वेतात सुमारे 300 लिटरपर्यंत दूध देते. उत्पादनामध्ये शेळीचे दूध दोन टक्केच आहे. शेळीपालन हा वेगाने वाढणारा शेती पूरक व्यवसाय व पर्यावरण पूरक दुग्ध व्यवसाय आहे.कृषी संशोधन केंद्राने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड,पनीर आणि आइस्क्रीम देखील तयार केले आहेत. शेळीच्या दुधापासून पेटा,पिकोरीना हे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

[metaslider id=4085 cssclass=””]

चला तर मग पाहूया शेळीच्या दुधाचे फायदे :
👉 शेळीचे दूध पचायला हलके असते. स्निग्ध पदार्थांच्या कानाचा आकार लहान असतो.
👉 शेळीच्या दुधात शरीर विरोधी सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक अधिक असतात.
👉 नऊ ते दहा प्रकारचे खनिजे आहेत. परिणामी आवश्यक खनिजाची कमतरता भरून होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते.
👉 शेळीचे दूध पिणे आरोग्याला फायदेशीर आहे.
👉आतड्यातील सूज कमी होण्यास मदत होते
👉कॅल्शियमची कमतरता असल्यास दुध पिल्याने कॅल्शियमची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
👉 दूध आणि हाडे मजबूत होतात.
👉 शेळीच्या दुधामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळते मुळे रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास मदत होते.
👉दुधात प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात सेवनामुळे शरीराचा विकास होण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांना शेळीचे दूध फायदेशीर ठरते

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button