आरोग्य

आरोग्यवर्धक फळ किवी! पाहुयात त्याचे गुणकारी फायदे…

Healthy fruit kiwi! Let's see its curative benefits ...

फळे ही आरोग्यास हितकारक असतात त्यामध्ये भरपूर प्रोटिन्स कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे असतात. म्हणूनच डॉक्टर म्हणतात रोज एकतरी फळ खा. अशाच एका फळाची माहिती आपण घेणार आहोत.
किवी के हिरवट चॉकलेटी रंगाचे आंबट गोड फळ आहे. या फळांमध्ये अनेक जाती आढळतात. बाहेरून चॉकलेट रंग असलेला किवी आतून काहीसा हिरवट रंगाचा असतो. त्यांच्या गरामध्ये लहान काळ्या रंगाचा बिया देखील असतात.


केवी फळाची चव आंबट गोड असते. बाजारामध्ये पण सहज उपलब्ध असलेले फळ किमतीने मात्र महाग असते. या फळाच्या सालीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. या सालीची चव जराशी वेगळी असते. किवी फळांमध्ये क जीवनसत्वाचा स्त्रोत असतो. तसेच किवी मध्ये अ इ के जीवनसत्वे आढळतात. तसेच यामध्ये सोडियम, पोटॅशियम क्लोराईड क्षार देखील असतात. तसेच लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, ये खनिजे काही प्रमाणात आढळतात.


अत्यंत गुणकारी असणारे हे फळ आरोग्याला हितकारक आहे चला पाहुयात याचे काही फायदे

🥝 रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे.

🥝 रक्तामधील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे अत्यंत गुणकारी आहे.

🥝 हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी किवी सेवन फायदेशीर ठरते.

🥝 किवी मध्ये खनिजाचा साठा असल्यामुळे रक्ताक्षया साठी उपयुक्त ठरते.

🥝 किवी चे नियमित सेवन केल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button