Health tips : ‘आयुर्वेदिक’ हळदीचे पहा गुणकारी फायदे!
Health Tips: 'Ayurvedic' turmeric Benefits!
हळद हे एक मसाले (Spices) वर्गातील प्रमुख नगदी पीक (Cash crop) म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते. महाराष्ट्रातील वातावरण हळद (Turmeric) लागवडीस अतिशय अनुकूल असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्यास महाराष्ट्रात (In Maharashtra) वाव आहे.
आपल्या रोजच्या आहारातील (Dietary) हळदीला अनन्य साधारण महत्त्व आहे. १०० ग्रॅम हळदीमध्ये खालील घटक आढळतात.(Turmeric contains the following ingredients.)
हेही वाचा : आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान!
पाणी ६ ग्रॅम सोडिअम १० मिली ग्रॅम
ऊर्जा ३९० कॅलरी लोह ४७.५ मिली ग्रॅम
प्रथिने ८.५ ग्रॅम अ जीवनसत्व १७५ आय. यु.
स्निग्ध पदार्थ ८.९ ग्रॅम ब जीवनसत्व ०.०९ मिली ग्रॅम
कर्बोदके ६९.९ ग्रॅम, ब – २ जीवनसत्व ०.१९ मिली ग्रॅम
तंतू ६.९ ग्रॅम निआसीन ४.८ मिली ग्रॅम
राख ६.८ ग्रॅम, अॅस्कॉरबीक अॅसिड ५० मिली ग्रॅम
कॅल्शिअम ०.२ ग्रॅम कुरकुमीन २ ते ६ %
फॉस्फरस २८० मिली ग्रॅम सुगंधी तेल ५ % पर्यंत
पोटॅशिअम २५०० मिली ग्रॅम
हेही वाचा : मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…
हळदीचे औषधी गुणधर्म(Medicinal properties of turmeric )
- आयुर्वेद शास्त्रानुसार (According to Ayurveda) हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमीनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपीत करणारी आहे.
- हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो तसेच ती रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे.
- पायावर सूज आल्यास हळद, गुळ व गोमुत्र गरम करून प्यावे.
- डोळ्याचे विकारावर हळकुंड तुरीच्या डाळीत शिजवून डोळ्यात अंजन करावे.
- डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते.
हेही वाचा :
1)व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…
2)मका’ पिकाची कशी लागवड करावी, याची संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर…