यशोगाथा

ऑफिस बॉय महिना 1200 रु महिना कमावणारे ते स्वतः ऑरगॅनिक शेती करून कमवले 400 कोटी रुपये…

ही यशोगाथा आहे. आयुष्याला एक नवीन वळण देणारी, सकारात्मकता देणारी, शून्यातून विश्व निर्माण करणे. या म्हणीला सत्यात उतरवणारी , अंधारातून उजेडाकडे वाटचाल करणारी , अभिनव फार्मर्स क्लब अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांची.
दहा वर्ष नोकरी करून महिना बाराशे रुपये कमावणारे, ज्ञानेश्वर बोडके यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.गावाकडे घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे वडील त्यांच्या या निर्णयावर नाखूष होते. तरीदेखील ते न डगमगता स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले.

सहा महिने बँकेत कर्जासाठी फेऱ्या मारल्यानंतर,त्यांना दहा लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. त्यांनी यासाठी त्यांनी फ्लोरीन कल्चरचा अभ्यासक्रम देखील केला. व त्यात त्यांनी मार्केटिंग तंत्रज्ञान विकसित कसे करावे याचे शिक्षण पुर्ण केले . फार्मिंग करताना त्यांनी प्रथम मार्केटिंग प्लेसचा विचार केला . व त्यांना दिल्लीला फुलांचे मार्केट चांगले आहे.असे जाणवले त्यांनी पॉलिहाऊस मध्ये कार्डिसॅन जातीची फुले लावली. कालांतराने फुले सुरू झाल्यानंतर त्याची पॅकिंग केली. व फुले रेल्वेने दिल्ली पर्यंत पोचवली गेली. तीन दिवस गेल्यानंतर फुले दिलेल्या व्यापाऱ्याचा फोन आला की पुढील फुले आम्हालाच हवीत म्हणून . केलेल्या कष्टाला फळ आलं. मेहनती च्या जोरावर त्यांनी एका वर्षात दहा लाख रुपयांचे कर्ज फेडलं.
त्यानंतर यशाची आगगाडी सुरू झाली.

11 लोकांना एकत्रित घेऊन त्यांनी नाबार्डच्या मदतीने अभिनव फार्मर्स क्लब स्थापना केली. व जबाबदारी वाटून घेतली. थोड्याच दिवसात अभिनव ग्रुप हा 305 लोकांचा झाला. आणि एका दिवशी एका वेळेस 305 जणांनी मारुती 800 गाडी घेतली. या गोष्टीमुळे पूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. आणि नाबार्डने त्यांच्या यशाला पुरस्कार प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी विदेशी भाजी करण्याचे ठरवले. त्याच्यासाठी त्यांनी हॉटेल्स, मॉल्स, त्यांच्याशी टाईप केला.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आयआयटी मुंबई यांनी त्यांना मार्केटिंग ॲप डेव्हलप करून दिली. आता त्यांच्या कामाचा पसारा हा खुपच वाढला असून त्यात महिला बचत गट यांचादेखील समावेश आहे. एका ग्रुप मुळे पाच लाख लोकांना रोजगार मिळाला. ऑफिस बॉय म्हणून महिन्याला बाराशे रुपये कमावणारे ज्ञानेश्वर बोडके आज चारशे कोटी काही कंपनीचे मालक आहेत.
विश्व हेच माझे घर त्यांनी स्वता बरोबर इतरांचाही आयुष्याला नवी कलाटणी दिली.
त्यांच्या धाडसाला, प्रामाणिकपणाला, कष्टाला, सतत नवीन करण्याच्या गोष्टीला, मी E-शेतकरी कडून मानाचा सलाम निश्चितच तुमच्या कडे पाहून म्हणावे लागेल मी E शेतकरी.🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button