यावर्षी पुरेसा पाऊस पडल्यानंतर खरीप हंगामाची पेरणी करण्यात यावी,असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी (ता. नांदेड) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख (Dr. Devikant Deshmukh) यांनी केले आहे. पुरेसा पाऊस न पडता घाईघाईने खरीप हंगामाची पेरणी करता केल्यास नुकसानीला सामोरे जावे लागेल.
कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी (Krishi Vigyan Kendra Pokharni) कापुस लागवड व्यवस्थापन या विषयावर आॅनलाईन कॉन्फरन्स झाली. त्यावेळी ते बोलत होते, शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर, खरीप हंगामाची पेरणी करण्यास सुरुवात करावी, त्याचप्रमाणे कापुसचे बी चे वाण जमिनीच्या प्रकारानुसार घेण्यात यावे.
त्याचप्रमाणे कापूस पीक (Cotton crop)घेण्यासाठी योग्य वेळ कोणती योग्य कीटकनाशके कोणती तसेच कापूस बियाणे घेताना कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत त्यांनी या कॉन्फरन्स (Conference) मध्ये चर्चा केली. विशेषतः कापसाचे फरदड घेऊ नयेत, कापसाच्या शेती मध्ये आंतरपीक म्हणून मूग, उडीद ही पिके घ्यावीत, तसेच निंबोळी अर्क (Neem extract) याची फवारणी करण्यात यावी, पेरणी करण्यापूर्वी शेतामध्ये शेणखत पसरून घ्यावे अशा प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केले तसेच सोयाबीन पिकावर बोलताना सोयाबिनचे वाण (Soybean varieties) एमएयूएस ७१, १५८, १६२, ६१२ फुले संगम या वाणाची लागवड करावी, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
1)सोयाबीनच्या ” ह्या ” आहेत नवीन विकसित जाती पहा या जातींची काय वैशिष्ट्ये आहेत.
2)वृक्ष ‘ लागवड करण्यासाठी मिळणार शंभर टक्के अनुदान! पहा : कोणती आहे ही योजना व कसा कराल अर्ज…