काळानुसार शेती पध्दतीमध्ये बदल होत आहेत. पारंपारिक शेतीपध्दतीला (traditional farming methods) बगल देत शेतकरी आधुनिकतेकडे वळत आहे. लासलगाव तालुक्यातील खेडले येथील शेतकरी नीलेश घोटेकर यांनी नवीन तंत्रानुसार एक एकर मध्ये लाल कांद्याची (Onion) पेरणी केली आहे. शिवाय कांद्याचीच पेरणी नाही तर या पेरणी यंत्राने कोथिंबीर, मेथी, गाजर या पीकांचीही पेरणी करता येणार आहे. याविषयी सविस्तर माहिती पाहुया.
वाचा –
कांदा हे चार महिन्याचे पीक आहे. यापुर्वी बियाणांची लागवड आणि मग दोन महिन्यांनी रोप लागवडीला येणार त्यामुळे कांदा पिकाचा कालावधी हा सहा महिन्याचा होतो. कांदा हे नगदी पीक आहे. बाजारपेठेत सर्वात अगोदर आवक झाली तर चांगले दरही मिळतात. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने पेरणी झाली तर लवकर उगवण होऊन उत्पादनही पदरी पडते. पण अजूनही ग्रामीण भागात रोप लावूनच लागवड करतात. खेडले येथील शेतकऱ्यांने नविन पेरणी यंत्र घेतल्याने गावच्या आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
पेरणी यंत्राचा फायदा –
कांद्याची प्रत्यक्ष लागवड करण्यापूर्वी आगोदर बियाणाच्या माध्यमातून रोप तयार करावे लागते. त्यावर वातावरणाचा परिणाम होऊन रोगराईचा धोका निर्माण होतो. आणि यामध्ये नुकसान झाले तर शेतकऱ्यांना किलोमागे 2 हजार 500 रुपयांचे नुकसान होते. शिवाय दोन महिने त्या कांद्याच्या रोपाची जोपासना करावी लागते. मात्र, पेरणी पध्दतीने थेट कांदा पिकावरच शेतकऱ्यांना लक्ष केंद्रीत करता येते. लागवडीसाठी मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही केवळ मजुरांअभावी कांद्याची लागवड रखडलेली आहे. त्यामुळे कमी वेळेत कांद्याच्या उत्पादनासाठी पेरणीयंत्रच महत्वाचे आहे.
वाचा –
कांद्याबरोबर इतर पिकांचाही पेरा
नवीन तंत्रात एक एकरात पेरणी करण्यासाठी कांद्याचे साधारण दोन किलो बी लागते आणि पेरणीनंतर सव्वा चार महिन्यात पीक तयार होते. एरवी दोन महिने रोपासाठी व नंतर लागवड त्यामुळे सहा महिन्याचा कालावधी कांद्यासाठी लागतो आणि त्या लागवडीसाठी साधारणता बारा हजार रुपये खर्च येतो.या नवीन तंत्रानुसार पेरणीमुळे सव्वा चार महिन्यात कांद्याचे पीक हातात येते व लागवड खर्च लागवड कमी होतो. स्वतः निलेशने कांदा पेरणी यंत्र घेतले असून त्या पेरणी यंत्राने कांदे, कोथिंबीर, मेथी, गाजर हे पीक सुद्धा पेरले आहेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा –