कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

लाल भेंडी चक्क 800 रु. किलोने विकली जातेय; ऐका शेतकऱ्याचे उत्पादन पाहून व्हाल चकित…

Have you seen the price of red okra? Rs 800 Sold by the kilo; Listen and you will be amazed to see the farmer's product.

मध्य प्रदेशचे शेतकरी भेंडी लागवड करून 800 रु. किलो दराने विकत आहेत. बाजारात त्यांच्या भेंडीला सामान्य भेंडीपेक्षा कित्येक पटीने जास्त दर (Higher rates) मिळत आहेत. शेतकरी मिश्रीलाल राजपूत खास प्रकारच्या भेंडीच्या लागवडीमुळे चर्चेत आहेत. लाल भेंडीची (red lady finger) किंमत बाजारात 300 ते 400 रुपये प्रति 250 ग्रॅम / 500 ग्रॅम आहे. मिश्रीलाल राजपूतला बाजारात लाल भेंडीची किंमत 800 रुपये प्रति किलो मिळत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. लागवड, उत्पादन आणि खर्च याविषयी सविस्तर माहिती घेऊया..

उत्पादन आणि येणार खर्च –

लाल भेंडी (red lady finger) लागवडीचा विचार करून मिश्रीलाल राजपूत यांनी कृषी संशोधन संस्थेतून (Agricultural Research Institute) 1 किलो बियाणे आणले. त्याची किंमत 2400 रुपये पर्यंत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तपेरले आणि सुमारे 40 दिवसात भेंडीचे उत्पादन सुरू सुद्धा झाले. एक एकर जमिनीवर किमान 40-50 क्विंटल आणि जास्तीत जास्त 70-80 क्विंटल उत्पादन घेता येते. यावर सुरवंट आणि इतर कीटकांचा परिणाम होत नाही तसेच त्याचे पीक सामान्य भेंडीपेक्षा लवकर तयार होते. मिश्रीलाल म्हणाले की भेंडी लागवडीमध्ये कोणत्याही कीटकनाशकाचा (Pesticides) अथवा औषधांचा वापर केला नाही.

वाचा: पीक विमा मंजूर: पुढच्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा व नुकसान भरपाई वाटप; कृषी मंत्र्यांचा “या” जिल्ह्यासाठी निर्णय..

शेतकरी मिश्रीलाल राजपूत, PHOTO CREDIT: ANI

मिश्रीलाल यांनी बनारसमधून प्रशिक्षण घेतले होते –

बनारसमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च सेंटरमध्ये (Indian Institute of Vegetable Research Center) लाल भेंडीची लागवड करण्याची पद्धत मिश्रीलाल यांनी शिकली. प्रशिक्षण घेऊन लाल भेंडी लागवडीचा विचार केला. आता चांगले उत्पादन घेत आहेत.

वाचा : आधारकार्ड वरील नाव व जन्मतारीख बदलू शकता आता मोबाईलवर; पहा प्रोसेस काय आहेत?

वाचा : महाराष्ट्रमध्ये उडीद, कांदा, सोयाबीन, डाळिंब या पिकाला सर्वात जास्त भाव कुठे; आपण पाहूया सविस्तरपणे…

लाल भेंडी इतकी महाग का आहे?

लाल भेंडीची किंमत बाजारात जास्त असल्याने व मागणीचे प्रमाणही अधिक असल्याने, किंमतही एवढी मिळत आहे. लोकांना लाल भेंडी भाजी खूप आवडते . ही लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा अधिक फायदेशीर आणि पौष्टिक असल्याचे बोलले जात आहे. तसेच हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या गंभीर समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांसाठी ही भेंडीची भाजी फायदेशीर आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button