योजना
ट्रेंडिंग

केंद्र सरकारची “ही” योजना पाहिलीत का? शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 टक्के सब्सिडी, लवकर घ्या या योजनेचा लाभ..

शेतकऱ्यांना शेतीसाठी यंत्रांची गरज नेहमी पडत असते. केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना करत असते. त्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) ट्रॅक्टर खरेदीवर सब्सिडी सुरू केली आहे. ही सब्सिडी पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत दिली जाते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती…

वाचा –

ही योजना शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत ट्रॅक्टर मिळवून देणार –

ज्यां शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कमकूवत असल्याने ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही. अशा स्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाडे तत्वावर घ्यावे लागते. किंवा बैलांचा उपयोग करावा लागतो. अशातच सरकारने मदतीसाठी योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर (PM Kisan Tractor) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत ट्रॅक्टर मिळवून देईल.

50 टक्क्यांपर्यंत सब्सिडी –

शेतकऱ्यांना ट्र्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने सब्सिडी (PM Kisan Tractor Yojana) सुरू केली आहे. ज्याअंतर्गत कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. उर्वरित रक्कम सरकारकडून सब्सिडी म्हणून मिळते. याशिवाय राज्य सरकारे देखील ट्रॅक्टर्सवर 20 ते 50 टक्क्यांपर्यंत सब्सिडी देत असते.

वाचा –

लाभ असा घ्या –

ही सब्सिडी सरकारच्या वतीने एकाच ट्रॅक्टरच्या खरेदीवर मिळते. जर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड, जमीनेचे कागदपत्र, बँकेच्या डिटेंल्स, पासपोर्टसाईज फोटो असायला हवे. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अप्लाय करता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button