शेतामधील “रानडुक्कर” हकलण्यासाठी “या” शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया पाहिलीत का?
रानडुकरांपासून (boar) धान पीक (crops) वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नवीन आयडिया शोधून काढली. रानडुकरे (boar) पळवण्यासाठी चक्क शेतात मिरचीची धुणी करून नुकसानीवर मात करण्याचा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी केला आहे. ती कशी? याविषयी सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
तुमसर तालुक्यातील पवनारा परिसरात रानडुकरांचा त्रास वाढला असल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती. येथील शेतकरी (Farmers) रानडुकरांच्या त्रासामुळे वैतागले होते. रानडुकरे कळपाने शेतात शिरकाव करून उभे धान पीक जमीन उध्वस्त करतात, यात शेतकऱ्यांचे (Farmers) प्रचंड नुकसान होते. रानडुकरे शेतात येऊ नये म्हणून शेतकरी वेगवेगळे उपाययोजना करतो. कित्येल उपाय केल्यानंतर हा उपाय उपयोगी पडला आहे.
वाचा –
शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला-
सुतळीचा पोत्यावर वाळलेल्या लाल मिरच्या घातल्या व त्यावर जळालेला ऑईल घालून लोखंडी सळाखीला गुंडाळून बांधून दिले. सायंकाळी ६ च्या सुमारास शेतावरील धुऱ्यावर ते उभे करून आग लावली. यामुळे निघणाऱ्या धुरात आईलची दुर्गंधी व मिरच्यामुळे रानडुकराला खेसखेसी होईल. त्यामुळे रानडुकरे येणार नाही, आणि झालेही तसेच. शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा