कृषी बातम्यायशोगाथा

तुम्ही पाहिलात का मोबाईल रसवंतीगृह! ‘या’ शहरात चालतो हा अनोखा बिझनेस..

Have you seen Mobile Raswantigriha! This is a unique business that runs in the city.

कष्टाला कल्पनेची जोड दिली तर खरेच तो बहरतो, खरंच काहीतरी नवीन करण्याची जिद्द लोकांमध्ये दिसून येत आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण कल्पना या युवक वापरताना दिसतात. असाच एक प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात दिसला .
अण्णा उर्फ रामदास गावडे यांनी स्वकल्पनेतून एक शोध लावला तो म्हणजे मोबाईल रसवंती गृह. खरंच गरजेतून काही नवीन नवीन आयडिया येतात.


उसाचा रस हे उन्हाळ्यातील आवडतं शीतपेय, हीच गरज म्हणून शोधलेला हा एक नवीन उपक्रम. एक डिझेल इंजिन वापरून चालते-फिरते रसावंतिगृह तयार केले. एक चार चाकी गाडीच जणू,या मध्ये बसायला जागा, वेगळे प्रकारचे टायर्स, ऊस ठेवण्यासाठी जागा. तसेच ऑटोमॅटिक पद्धतीने ऊसाचा रस तयार करतात. मोबाईल रसवंतीगृह म्हणजे च वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उसाचा रस तयार करून विकणे. याचा फायदा एक असा ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी लगेच जाऊन आपला रसाचा बिजनेस चालू करू शकतो.

त्यांच्या उसाच्या रसामध्ये लिंबू, आलं यांचं मिश्रण असतं त्यामुळे त्याची चव एक वेगळीच असते.
हेच ते मोबाईल रसवंतीगृह अण्णांच्या डोक्यातून साकरलेली एक भन्नाट कल्पना. असेच युवकांनी पुढे येऊन स्वतःचा उद्योग चालू करणे योग्य आहे. सरकार सुद्धा अशा लोकांना काही योजनांमधून मदत करते. तर लढवा तुमचं डोकं आणि शोधा नवीन नवीन आयडिया. म्हणजेच लवकरच आपण आत्मनिर्भर होऊ या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button