Buffelo |ऐकला का तुम्ही कधी 10 कोटींचा ‘ रेडा ‘ .. जाणून घ्या याची विशेष माहिती..
मेळाव्यामध्ये आणला दहा कोटींचा रेडा –
अखिल भारतीय किसान मेळावा , मेरठच्या सरदार वल्लभ भाई पटेल कृषी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता.भारतरत्न नानाजी देशमुख जयंती निमित्त दरवर्षी हा मेळावा भरविला जातो . त्या ग्रामोदय पशु मेळ्यात या रेड्याला आणण्यात आलं आहे. हरयाणाच्या पानीपतहून हा रेडा या मेळाव्यात आला (Information)आहे. या रेड्याचं नाव गोलू आहे. मेळ्याला भेट देणारे अनेकजण गोलू सोबत सेल्फी किंवा फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत आहेत.
गोलू 2 च्या विशेषता –
हा रेडा मुर्राह जातीचा असून शरीराचे वजन दीड टन असावे
उंची साडेपाच फूट व लांबी 14 फूट आहे . वीर्याचे 700-800 डोस दर आठवड्याला विकावे लागते. 100 रुपयांपासून 300 रुपय डोजपर्यंत वीर्य विकले जाते. म्हणजे गोलू टू पासून दर आठवड्याला 70 हजार रुपयांपासून ते अडीच लाखांपर्यंत कमाई पशुपालकाला होते .फेब्रुवारी ते जुलै पर्यंत सर्वाधिक सीमन विकले (Information)जाते.
वाचा: ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..
गोलू 2 ची माहिती –
गोलू चे वय ४ वर्षे आणि ६ महिने आहे. तो पीसी ४८३ या रेड्यापासून झाला असून पीसी ४८३ देशभरात प्रसिद्ध आहे. नरेंद्र सिंग यांनीच हरियाना सरकारला पीसी ४८३ जनावराच्या जात सुधारणेसाठी भेट म्हणून दिला होता. नरेंद्र सिंग यांचे पशुपालन संदर्भात असलेले मोठे योगदान पाहून त्यांना पद्मश्री दिली गेली (Information)आहे. गोलू साठी रोज ३२ किलो हिरवा आणि सुका चारा दिला जातो. त्याचबरोबर आठ किलो गहू, हरभरा आणि ६० ग्राम मिनरल मिश्रण असा आहार असून गोलू ला सध्या जगात तोड नाही असा दावा नरेंद्र सिंग करतात.
पशुपालनातून उत्पन्न –
नरेंद्र सिंग सर्व शेतकरी बंधूनी चांगले वीर्य वापरून उत्तम दर्जाचे पशु तयार करावेत असे आवाहन केले आहे. या रेड्याची स्पर्म विकून मालक दर महिन्याला लाखो रुपयांची कमाई करतो. हरयाणाशिवाय पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह बऱ्याच राज्यांत रेड्यांच्या स्पर्मला मागणी आहे.नरेंद्र सिंग म्हणाले (Information)महागाई पाहता पशुपालन सहज परवडणारे नाही. त्यामुळे पशुपालनातून चांगले उत्पन्न मिळवायचे असले तर चांगल्या दर्जाची जनावरे जन्माला आली पाहिजेत याची काळजी घ्यायला हवी.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: