ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

सात बाऱ्यात ५० वर्षानंतर करण्यात येणार ‘हा’ बदल! तसेच ऑनलाइन फेरफार कसा कराल? जाणून घ्या

'Ha' change will be made in seven times after 50 years! Also how do you make changes online? Find out

जमिनीचे व्यवहार (Land transactions) करताना सातबारा हे शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. सात बारा हा जमिनीची निगडित शब्द आहे. पण सात बारा प्रत्येकांना समजतो असे नाही. यामुळे सरकारने सात बारा (Seven twelve) सोपा करण्याचा विचार केला आहे.

हा उतारा सर्वांना समजेल अशा भाषेत येणार असून त्यावर क्युआर कोडही (QR code too) असणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा बदल करण्याचा निर्णय घेणात आला.

हेही वाचा : जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…

[metaslider id=4085 cssclass=””]

गाव नकाशा शेत जमीन गावठाण यांच्याशी निगडीत येणारा शब्द म्हणजे सातबारा आठ, ‘अ’ म्हणजेच फेरफार.

गावाकडे या फेरफार शब्दाला फार मोठे स्थान आहे. एखाद्या जमिनीची नोंदणी, वारस नोंदणी, आकार, जमीन खरेदी विक्री,जमिनीवर बोजा चढवणे, जमिनीवर बोजा उतरवणे या संबंधित सरकारी कागद म्हणजेच जमिनीचा फेरफार. बराच वेळेस जमिनी खरेदी करताना फेरफार चेक केला जातो. यासाठी सरकारी कार्यालयांना हेलपाटे घालावे लागतात, अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात. पण आता मात्र सरकारने खास तुमच्यासाठी घर बसल्या ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात बरेचसे कामे ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. त्यापैकी हे सातबारा, आठ अ, हेसुद्धा आपण ऑनलाईन बघू शकतो.

हेही वाचा : एकच वनस्पती त्याचे दोन फायदे! जनावरांसाठी चारा आणि पिकांना खत म्हणून उपयुक्त जाणून घ्या; या वनस्पती बद्दल सर्व माहिती…

कसा बघायचा ऑनलाईन?

सातबारा ऑनलाइन पाहाण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल वर https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.

या संकेत स्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे महसूल विभागाची वेबसाईट दिसेल. त्यानंतर आपली चावडी हा पर्याय तिथे उपलब्ध असेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डिजिटल नोटीस बोर्ड नावाचे पेज उघडेल. त्या पेजवर तुम्ही तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि गावाचे नाव इंटर करायचे आहे.

यानंतर तुमच्या गावातील सगळ्या फेरफार नोंदी तुम्हाला दिसतील. या फेरफार नंबर तुम्हाला दिसतील या फेरफार नंबर आले पुढील पहा हा पर्याय दाबल्यास एक पेज ओपन होऊन त्यामध्ये तुम्हाला गट नंबर, फेरफार चा प्रकार आणि तारीख दिसेल. यावरून आपण मोजणी सुद्धा मागू शकतो, किंवा दुसरी कोणी मागवली असेल ते सुद्धा आपल्याला कळू शकते.

हेही वाचा :


1)75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…

2)मी E शेतकरी बोलतोय, शेतीचा शोध कधी व कोठे लागला ठाऊक आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button