गुरु पौर्णिमा 2021: जाणून घ्या गुरूपौर्णिमेचे महत्त्व
Guru Pournima 2021: Learn the importance of Guru Purnima
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे ‘गुरुपौर्णिमा.’ या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत व त्यांना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे. व्यासमुनींना गुरुंचे गुरु मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हटले जाते.
गुरु म्हणजे अंधःकार, रू म्हणजे दूर करणारा. तुमचा अंधःकार जो दूर करतो तोच गुरू आहे.” – सद्गुरू
गुरु हा शब्द संकृत भाषेत “अंधकार दूर करणारा” या अर्थाने वापरला जातो. गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो, आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्त्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिकरित्या साधक त्यांच्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात. योग साधना आणि ध्यान यांचा अभ्यास करण्यासाठी गुरुपौर्णिमेचा दिवस विशेष फायदेशीर मानला जातो.
गुरु आहे अंबरात,गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी,गुरु आहे चराचरात
गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस. ह्या दिवशी शाळेत, मठ, मंदिरात, अभ्यास मंडळांत, आश्रमांत, गुरूकुलात गुरूंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरूजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. नवजात जन्मलेल्या बालकाची प्रथम गुरू असते ती माता. चालायला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवतो तो पिता. शालेय जीवनात ज्ञान, कला, विज्ञान ह्यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक-शिक्षिका, आपण कोण आहोत, आपल्या जन्माचं कारण काय ह्याचेच मार्गदर्शन करणारे गुरु.
आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात. गुरुंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करुन आपल्या ध्येयावर केंद्रीत होण्याचा निश्चय करायचा असतो. गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.
हे ही वाचा: