ताज्या बातम्या
Gulkand Recipe | विकतचं केमिकलयुक्त गुलकंद खाताय? तर थांबा अन् घरच्याघरीच ‘अशा’ पद्धतीने बनवा १०० टक्के नॅचरल गुलकंद
Are you eating the chemically-laden Gulkand? So wait and make 100 percent natural Gulkand at home 'like this
Gulkand Recipe | गुलकंद हा एक अतिशय आरोग्यदायी पदार्थ आहे. हिवाळ्यात गुलकंद (Gulkand Recipe) खाण्याची प्रथा आहे. गुलकंदमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा संपूर्ण अर्क उतरलेला असतो. गुलकंद (Benefits of eating Gulkand) खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होते, दाह कमी होतो आणि त्वचेचे सौंदर्य वाढते. विकतचे गुलकंद अनेकदा केमिकलयुक्त असतात. त्यामुळे घरच्याघरी गुलकंद तयार केल्यास ते अधिक निरोगी आणि सुरक्षित असते. घरच्याघरी गुलकंद तयार करणे सोपे आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.
- साहित्य
- गुलाबाच्या पाकळ्या – ३०० ग्रॅम
- साखर – १०० ग्रॅम
- पिठी साखर – २०० ग्रॅम
- मध – ५० ग्रॅम
- बडिशेप पावडर – १० ग्रॅम
- वेलची पावडर – अर्धा टीस्पून
- कृती
- १. गुलाबाच्या पाकळ्या एका मोठ्या भांड्यात घ्या.
- २. साखर आणि बडिशेप एकत्र करून त्याची पावडर करून घ्या. ती पावडर गुलाब पाकळ्यांमध्ये टाका. तसेच पिठी साखरही टाका.
- ३. आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून कालवून घ्या. हाताचे चोळून चोळून एकजीव करून घ्या. हळूहळू गुलाबाला पाणी सुटेल.
- ४. यानंतर त्यात वेलची पावडर तसेच मध टाका आणि पुन्हा एकदा सगळे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.
- ५. आता हे मिश्रण एका एअर टाईट काचेच्या बरणीत भरा आणि ३ दिवसांसाठी उन्हामध्ये ठेवा.
- ६. ३ दिवसांनी बरणी उघडून पाहा. अगदी विकतच्यापेक्षाही खूप उत्कृष्ट चवीचं गुलकंद तुमच्या घरीच तयार झालेलं असेल.
वाचा : Honda CB350 | रॉयल एनफिल्डची उलटी गिनती सुरू! बाजारात ‘या’ जबरदस्त गाडीच्या रेट्रो स्टाईल अन् परफॉर्मेंसने तरुणाईला लावले वेड
- गुलकंद बनवताना खालील गोष्टी लक्षात ठेवा
- गुलाबाच्या पाकळ्या ताज्या आणि गावरान असाव्यात.
- गुलकंद बनवताना गुलाब पाकळ्यांचा पूर्ण वापर करावा.
- गुलकंद बनवताना साखर आणि पिठी साखर योग्य प्रमाणात वापरावी.
- गुलकंद बनवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांपेक्षा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त चांगला गुलकंद बनतो.
- घरच्याघरी गुलकंद बनवून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.
हेही वाचा :
Web Title: Are you eating the chemically-laden Gulkand? So wait and make 100 percent natural Gulkand at home ‘like this’