ताज्या बातम्या

रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा; सर्व समस्या “कॉमन सर्व्हिस सेंटरच्या” माध्यमातून सुटणार व मिळणार “या” सेवांचा लाभ..

जीवनावश्यक गोष्टीमध्ये अन्न पाण्याबरोबर रेशनकार्ड (Ration card) ही तितकेच गरजेचे आहे. रेशनकार्ड (Ration card) हे घरातील सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. अल्प आणि गरीब उत्पन्न गटातील कुटुंबासाठी रेशनकार्ड (Ration card) हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे रेशनकार्ड संबंधितल्या काही गोष्टी माहीत असणे गरजेच्या आहेत. रेशनकार्ड (Ration card) हरवल्यास काय करावे? किंवा आधारकार्ड (Aadhaar card) सोबत कसे जोडावे? किंवा काही माहिती अपडेट करायची असल्यास कशी करावी? इत्यादींची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.

वाचा –

डिजिटल अभियानातून देण्यात आली माहिती –

डिजिटल अभियानाच्या (Digital campaigns) माहितीनुसार सांगितले आहे की, रेशनकार्ड (Ration card) संबंधित कोणतीही अडचणी निर्माण झाल्यास.. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या (Common Service Center) माध्यमात जाऊन रेशनकार्ड (Ration card) संबंधितल्या समस्या सोडवू शकते. कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून रेशनकार्ड (Ration card) धारक स्वतःची कोणतीही माहिती अपडेट करू शकतो.

वाचा –

रेशनकार्ड गहाळ झाल्यास काय करावे ?

रेशनकार्ड (Ration card) हरवल्यास घाबरण्याची गरज नाही. फक्त कॉमन सर्विस सेंटर (Common Service Center) पर्यंत जाण्याची गरज आहे. या सेवेच्या माध्यमातून रेशनकार्ड हरवल्यास तुम्ही डुप्लिकेट बनवून घेऊ शकता. तसेच नवीन बनवायचे असेल तर या सेवेच्या माध्यमातून अर्ज देखील करू शकता. अशी माहिती या केंद्राने दिलेली आहे. अशाप्रकारे तुम्ही नवीन रेशनकार्ड (Ration card) मिळवू शकता. तसेच तुम्ही रेशनकार्ड (Ration card) आधारकार्डशी (Aadhaar card) देखील लिंक करू शकता. अगदी कोणतीही अडचण असल्यास या केंद्राच्या माध्यमातून सोडवू सहज सोडवल्या जातील.

रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे-

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (Ministry of Electronics and Information Technology) अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागा सोबत “कॉमन सर्विस सेंटर सुविधेने” (Common Service Center Facility) सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे केंद्राच्या (Center) माध्यमातून रेशनकार्ड (Ration card) धारकांना सर्व सेवा पुरवल्या जाणार आहेत. सर्व समस्या या सेवेच्या माध्यमातून सुटणार असल्याने रेशनकार्ड धारकांना दिलासा मिळालेला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button