Electric Scooter | धमाका करायला येतेय स्वस्तातली जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; मिळणार 151km रेंज किती असेल किंमत?
Electric Scooter | आपण 15 डिसेंबर 2023 रोजी भारतीय बाजारात आपली सिंपल डॉट वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहोत. तसेच लॉन्चिंग बरोबरच कंपनी आपल्या या मॉडेलसाठी प्री- बुकिंग देखील सुरू करेल. अशी घोषणा सिंपल एनर्जीकडून सोमवारी करण्यात आली आहे. सिंपल वननंतर, सिंपल डॉट वनला कंपनीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric Scooter) सीरिजमध्ये सब- व्हेरियंट म्हणून स्थान देण्यात आले आहे.
किती असेल किंमत?
सिंपल वनच्या सिंपल डॉट वन मॉडेलकडे अधिक बजेट- फ्रेंडली मॉडेल म्हणून बघितले जात आहे. मात्र, या स्कूटरची आधिकृत किंमत पुढील महिन्यातच समजू शकेल. महत्वाचे म्हणजे, सिंपल वन मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹1.45 लाख (कर आणि सबसिडीपूर्वी) एवढी आहे.
वाचा : Electric Scooter | शेतकऱ्यांनो ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त 28 हजारांत घ्या 80Km ची जबरदस्त रेंज देणारी स्कूटर
मॉडेलची रेन्ज 151 किमी
सिंपल डॉट वनला एक निश्चित 3.7 kWh क्षमतेची बॅटरी मिळेल. महत्वाचे म्हणजे, या मॉडेलची प्रमाणित रेन्ज 151 किलोमीटर एवढी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरला विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेले टायर देण्यात आले आहेत. हे टायर हिची ऑनरॉड रेन्ड वाढवतात.
या शिवाय या मॉडेलसोबत इतर हायलाइट्स शिवाय 30 लीटर अंडर-सीट स्टोरेज एरिया, टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर तसेच अप कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. जानेवारी 2024 मध्ये या मॉडेलची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे.
Web Title: A great cheap electric scooter is coming to explode; What will be the price of 151km range?
हेही वाचा