“या” योजनेच्या लाभार्थ्यांना 67 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर; लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार..
एक शेतकरी एक अर्ज अनेक योजनांच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर , पावर ट्रीलर , कृषि अवजारे , कांदा चाळ अशा बाबींसाठी अर्ज केलेले आहेत. त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत व त्यांना पेमेंट आलेलं नाही. अनुदान आलेल नाही अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक महत्वपूर्ण उपडेट आहे. याविषयी सविस्तर पाहुया..
वाचा –
महाडीबीटि पोर्टल वरती एक शेतकरी एक अर्ज अनेक योजनांच्या अंतर्गत RKVY ही सुद्धा योजना राबवली जाते. आणि याच RKVY अर्थात राष्ट्रीय कृषिविकास योजनेच्या अंतर्गत कृषि यांत्रिणिकरण कांदा चाळीचे सुद्धा अनुदान दिले जाते . या योजणेकरीता २०२०-२१ मध्ये अनेक साऱ्या लाभार्थ्याना अर्ज केलेले होते. अर्ज पात्र होऊन पूर्वसंमती येवून त्यांनी चलणे उपलोड केलेली होती मात्र अजूनही हे अनुदान आलेले नव्हते. अशाच लाभार्थ्यासाठी ६७ कोटी रुपये निधी याठिकाणी मंजूर करून वितरित करण्यात येत आहे. यासाठी परवानगी देण्यात आली होती. या संदर्भातील एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला होता. तो सविस्तर पाहुया..
शासन निर्णय –
१) सन २०२०-२१ मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजना – रफ्तार या केंद्रपूरस्कृत योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अमलबजावणीसाठी केंद्र व राज्याच्या ६०:४० अर्थसहायाच्या प्रमाणात प्राप्त निधिपैकी प्रकल्पनिहाय वितरण बाकी असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गाचा रु. ६४.३६ कोटी निधी व अनुसूचित जाती प्रवर्गाचा उर्वरित रु.२.९० कोटी निधी अशा एकूण रु. ६७.२६ कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण या शासन निर्णयान्वये करण्यात येत आहे. सदर वितरणाचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट- अ मध्ये दर्शविण्यात आला असून आयुक्त यांनी सदर संबंधित अंमलबजावणी यंत्रनेस उपलब्ध करून द्यावा.
वाचा –
२) राष्ट्रीय कृषि विकास योजना – रफ्तार या योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रवर्गनिहाय विनियोग करताना दी ११/१२/२०२० रोजीच्या शासन निर्णयातील सूचना/कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. अशा सूचना दिलेल्या आहेत.
३) सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९२४११३३०२७९०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून देण्यात येत आहे.
अनुदान वितरण –
कृषि यांत्रिणिकरण प्रकल्पासाठी २०२१-२२ मध्ये ३८.३९ कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आलेली आहे. कांदा चाळ प्रकल्पासाठी एकूण २८ कोटी रुपये असे एकूण या योजणेकरीत ६७.२६ कोटी एवढा निधी याठिकाणी वाटप करताना मंजूरी देण्यात आली आहे ६७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
हे ही वाचा –